शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात काका सुसाट, विशाल पाटील सपाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:54 IST

खासदार संजयकाका पाटील यांचे होमग्राऊंड असतानाही सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादीने विरोधाचे जोरदार वातावरण केले, मात्र पडळकरांचा दखलपात्र ठरलेला वंचित्र फॅक्टर, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतलेली संधिसाधू भूमिका यामुळे विशाल पाटील धक्कादायकपणे तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. दुसरीकडे खासदार संजयकाका पाटील यांनी मात्र मोदी लाटेवर निवडून आलेले खासदार, हा शिक्का पुसून स्वकर्तृत्वावर आपली व्होटबँक अबाधित असल्याचे दाखवून दिले.

ठळक मुद्देतासगावात काका सुसाट, विशाल पाटील सपाट...संजयकाका यांची व्होटबँक अबाधित

दत्ता पाटील तासगाव : खासदार संजयकाका पाटील यांचे होमग्राऊंड असतानाही सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादीने विरोधाचे जोरदार वातावरण केले, मात्र पडळकरांचा दखलपात्र ठरलेला वंचित्र फॅक्टर, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतलेली संधिसाधू भूमिका यामुळे विशाल पाटील धक्कादायकपणे तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. दुसरीकडे खासदार संजयकाका पाटील यांनी मात्र मोदी लाटेवर निवडून आलेले खासदार, हा शिक्का पुसून स्वकर्तृत्वावर आपली व्होटबँक अबाधित असल्याचे दाखवून दिले.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात खासदार संजयकाका पाटील यांना प्रत्येक निवडणुकीत संघर्ष करावा लागला होता. गतवेळच्या निवडणुकीत संजयकाकांना मोठे यश मिळाले. मात्र त्यावेळी मोदी लाटेवर निवडून आलेले खासदार असा शिक्का त्यांच्यावर बसला होता. मात्र त्यांनी गेल्या पाच वर्षातील कर्तृत्वाच्या जोरावर स्वत:चा बालेकिल्ला भक्कम केला.विशाल पाटील यांची सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीवर भिस्त होती. मात्र राष्ट्रवादीतील नेत्यांनी संधीसाधू भूमिका घेतली. आपला खासदार म्हणून काही कारभाऱ्यांनी मवाळ भूमिका घेतली. दुसरीकडे आघाडी धर्माला बगल देत, अनेकांनी पडळकरांचा झेंडा खांद्यावर घेतला. पडळकरांच्या वंचित फॅक्टरचा या निवडणुकीत मोठा प्रभाव दिसून आला. मात्र या मतदारसंघात पडळकरांना मिळालेले मतदान हे केवळ वंचित फॅक्टरचे नसून, राष्ट्रवादीने केलेल्या गमती-जमतीचेदेखील असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.पक्षाध्यक्ष शरद पवार यांची सभा घेऊन राष्ट्रवादीकडून वातावरण निर्माण केले. मात्र पक्षातील नेतेमंडळींनीच नरो वा कुंजरोवा भूमिका घेतल्याने, अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पडळकरांचा रसद पुरवली. मतदारसंघातील १०९ पैकी तासगाव तालुक्यातील ३५ आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ३४ अशा ६९ गावांमध्ये खासदार संजय पाटील यांना मताधिक्य मिळाले.

गोपीचंद पडळकर यांना कवठेमहांकाळ तालुक्यातील २५ आणि तासगाव तालुक्यातील ३, अशा २८ गावांमध्ये मताधिक्य मिळाले, तर विशाल पाटील यांना तासगाव तालुक्यातील १० आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील फक्त २, अशा १२ गावांमध्ये मताधिक्य मिळाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsangli-pcसांगली