शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...अन् कडेगावच्या अश्विनीचा झाला अंश, लिंग परिवर्तनाची शेवटची शस्त्रक्रियाही यशस्वी

By संतोष भिसे | Updated: March 3, 2024 16:35 IST

पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर गॅझेट करून अंश खलिपे हे नाव धारण केले. पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया १६ मार्च रोजी २०२२ रोजी झाली.

कडेगाव : तोंडोली (ता. कडेगाव) येथील अश्विनी खलिपे यांच्यावर दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात टप्प्याटप्प्याने झालेल्या तीन लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या आहेत. डॉ. भीमसिंग नंदा यांनी तिन्ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या, यामुळे अश्विनीची आता अंश खलिपे अशी ओळख झाली आहे.दोन वर्षांपूर्वी अश्विनी खलिपे या २८ वर्षीय तरुणीने लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर गॅझेट करून अंश खलिपे हे नाव धारण केले. पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया १६ मार्च रोजी २०२२ रोजी झाली. नंतर चार महिन्यांनी दुसऱ्या टप्प्यातील शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. त्यानंतर आता नुकतीच तिसरी शस्त्रक्रियाही यशस्वी झाल्याने अश्विनी आता अंश म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. अश्विनीच्या शारीरिक जडणघडणीतून लहानपणापासून पुरुषाप्रमाणे बदल दिसून येत होते. करारीपणा, निडरपणा, पोशाख या सर्व बाबतीत पुरुषाप्रमाणे वर्तन होते. त्यामुळे तिने लिंग परिवर्तन करुन मुलगा होण्याचा निर्णय घेतला. तोंडोलीसारख्या ग्रामिण भागातील मुलीने घेतलेला हा निर्णय अत्यंत धाडसी होता. त्याला कुटुंबियांनी पाठिंबा दिला. समाजाडा परिवर्तनाची नवी दिशा दिली.

अंश खलिपे याने सांगलीत कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सध्या भारती विद्यापीठाच्या पुणे येथील कायदा महाविद्यालयात कायद्याचे पुढील शिक्षण घेत आहे.

अंशची वकिलीमध्ये लवकरच एन्ट्रीसमाजातील दबलेल्या असंख्य तरुण- तरुणींसाठी अंश खलिपे यांचा लिंग परिवर्तनाचा यशस्वी प्रयोग दिशादर्शक ठरणार आहे. तिन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. अंश आता पुणे येथील घरी विश्रांती घेत आहे. लवकरच वकील म्हणून नव्या ऊर्जेने कार्यरत होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली