शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कदम-देशमुख गटात रंगणार परंपरागत सत्तासंघर्ष...

By admin | Updated: July 5, 2016 00:29 IST

कडेगाव, नगरपंचायत संभाव्य चित्र

प्रताप महाडिक -- कडेगाव नगरपंचायतीची पहिली निवडणूक नोव्हेंबरमध्ये होत आहे. यामुळे कडेगाव शहराचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार? कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवड निवडून आलेले नगरसेवक बहुमताने करतील, असा सुधारित अध्यादेश निघाला आहे. नगरपालिकेप्रमाणे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा नियम नगरपंचायतीसाठी लागू नाही. निवडून आलेले नगरसेवक बहुमताने नगराध्यक्षाची निवड करतील. प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक, याप्रमाणे कडेगाव येथे १७ प्रभागांतून १७ नगरसेवकांची निवड होणार आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे कडेगावची नगरपंचायत निवडणूक ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, युवा नेते धनंजय देशमुख यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी कडेगाव नगरपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी आघाडी शासनाच्या काळात तसेच सध्या सत्ताधारी भाजपच्या काळात कडेगाव शहरातील विकासकामे, सामाजिक शांतता, राजकीय घडामोडी आदी बाबीत बारकाईने लक्ष घालून सातत्याने संपर्क ठेवला आहे. टेंभू योजनेच्या पाण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला आहे.माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगावला राजकीय राजधानी मानून मोठा विकास केला. कडेगाव तालुक्याची निर्मिती, विविध शासकीय कार्यालयांची मंजुरी आणि इमारतीची उभारणी यासाठी पुढाकार घेतला. टेंभू योजनेसाठी मंत्रिपदावर असताना निधीसाठी पाठपुरावा केला. ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, युवक नेते विश्वजित कदम यांचाही कडेगावातील विकासकामे, तसेच राजकीय घडामोडींशी सातत्याने संपर्क असतो.रस्त्याचे चौपदरीकरण, अद्ययावत बस स्थानकाची उभारणी ही कामे मंजुरीसाठी, पूर्णत्वासाठी पतंगराव कदम यांनी पुढाकार घेतला. कडेगाव येथील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी विकास कामांच्या मुद्यावर निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. दीपक भोसले यांनी नुकतीच कडेगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. यावेळी आ. पतंगराव कदम, डॉ. विश्वजित कदम, डॉ. जितेश कदम आदी नेतेमंडळी उपस्थित होती. याबाबतही कडेगाव नगरीत चर्चा होत आहे. पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये गेल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद मर्यादित झाली आहे. यामुळे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड, युवक जिल्हाध्यक्ष शरद लाड यांना कडेगावमध्ये लक्ष घालावे लागणार आहे.काँग्रेस एकसंध ठेवण्याचे आव्हानग्रामपंचायत निवडणुका पॅनेलच्या चिन्हावर लढविल्या जातात. परंतु आता कडेगाव नगरपंचायतीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविली जाणार आहे. यामुळे कॉँग्रेसच्या हाताला साथ मिळणार, की भाजपचे कमळ फुलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस एकसंध ठेवण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम सर्व कॉँग्रेस कार्यकर्त्यांना काय उपदेश देणार, यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. कडेगाव शहरात आता नगरपंचायतीच्या निवडणुकीचा ज्वर फुलू लागला आहे. येथे माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळीही निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आहेत. शिवसेनेची भूमिकाही अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यांची ताकदही मर्यादितच आहे. सध्या पक्षाचे बिल्ले दाखवत निवडणुकीची तयारी सुरू असली तरी, निवडणुकीत कदम विरूध्द देशमुख असाच सामना रंगणार आहे. मोर्चेबांधणीला वेगकाँग्रेस व भाजप दोन्ही बाजूनी नगरपंचायतीच्या सत्तेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. पूर्वानुभव लक्षात घेता, काँग्रेसपुढे गटबाजी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकद येथे मर्यादित आहे. आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी काँग्रेस एकसंध ठेवून ताकदीने निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आहेत, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही कडेगावची सत्ता काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. काँग्रेसने मेळावे तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकांवर जोर दिला आहे, तर भाजपकडून थेट मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी नगरपंचायत निवडणूक पारंपरिक विरोधकांमध्येच चुरशीने होणार, हे स्पष्ट आहे.