शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘कडकनाथ’प्रकरणी सहाशेवर तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:46 IST

सांगली/इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन फसवणूक प्रकरणाचा गतीने तपास सुरू आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले आहे. ...

सांगली/इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन फसवणूक प्रकरणाचा गतीने तपास सुरू आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले आहे. रयत अ‍ॅग्रो इंडिया आणि महारयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपन्यांकडून महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंतच्या शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली असून, आतापर्यंत सहाशेवर तक्रार अर्ज आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या हणमंत शंकर जगदाळे (रा. अंबक-चिंचणी, ता. कडेगाव, जि. सांगली) या दुसºया संचालकाला येथील न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. कंपनीचा संचालक संदीप सुभाष मोहिते याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.शर्मा म्हणाले की, कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात तक्रारदारांची संख्याही वाढत आहे. रयत अ‍ॅग्रो कंपनीचे कार्यालय बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर या कोंबड्यांचे करायचे काय, कोंबडी खाद्याचे काय करायचे, असे प्रश्न आहेत. ग्राहक मिळविण्यातही अडचण आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सखोल चौकशी करणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. सोमवारी कर्नाटकातील बिदर येथील एक कुटुंब चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन पोलिसांकडे आले होते.अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख मनीषा डुबले यांनी इस्लामपूर येथे भेट देऊन माहिती घेतली. अटकेत असलेल्या संदीप मोहिते याच्याकडे कसून चौकशी केली. त्याचबरोबर अधिकाºयांना तपासकामी सूचनाही केल्या. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने प्रत्येक शक्यता काटेकोरपणे पडताळून संशयितांविरुध्द भक्कम पुरावे संकलित करावेत, असे निर्देश दिले. पोलीस उपअधीक्षक कृष्णत पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी डुबले यांना माहिती दिली.राज्य आणि परराज्यातील आठ ते दहा हजार शेतकºयांची ५०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणाºया कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायातील कंपनीच्या पाच संचालकांविरुध्द शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. पोलिसांनी इस्लामपूर आणि पुणे येथील कार्यालये सील केली आहेत. पुण्याच्या कार्यालयातील प्रत्येक कागदपत्राची तपासणी करून ती ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.मोठ्या गुंतवणूकदारांच्या अद्याप तक्रारी नाहीतआतापर्यंत एक लाखापासून अडीच लाखापर्यंत फसवणूक झालेले गुंतवणूकदारच तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत. मात्र, पाच लाखांपासून ३० लाखांपर्यंत फसवणूक झालेले गुंतवणूकदार अद्याप पोलिसांकडे आलेले नाहीत. अशा मोठ्या गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यावर या घोटाळ्यातील आकडा वाढण्याची शक्यता आहे.