शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

बोरगावमधून जितेंद्र पाटील हॅट्ट्रिकच्या तयारीत

By admin | Updated: December 22, 2016 00:08 IST

जयंत पाटील यांना आव्हान : विकास आघाडीची भूमिका निर्णायक; गड काबीजसाठी जोरदार तयारी

नितीन पाटील ल्ल बोरगाववाळवा तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसकडून उमेदवारीचे दावेदार म्हणून जितेंद्र पाटील यांचे एकमेव नाव आहे. यावेळी ते तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्ट्रिक करणार, की त्यांची घोडदौड रोखण्यात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यशस्वी होणार, याकडे जिल्ह्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत.दुसरीकडे खा. राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील हे विकास आघाडीच्या माध्यमातून बोरगावचा गड काबीज करण्यासाठी तयारीला लागले आहेत. त्यामुळे येथे तिरंगी लढत होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.बोरगाव जिल्हा परिषद गट खुला आहे, तर पंचायत समितीचा बोरगाव गण ओबीसी पुरुष गटासाठी आरक्षित आहे आणि ताकारी गण मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित आहे. जिल्हा परिषदेसाठी अनेकांनी शड्डू ठोकला आहे. मात्र काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षातून हुकमी उमेदवार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. काँग्रेसमधून रणधीर पाटील व अपक्ष म्हणून मिलिंद पाटील जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतून राजारामबापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील, ‘कृष्णा’चे माजी संचालक उदयसिंह शिंदे, उपसरपंच विकास पाटील, ‘महानंद’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांचे पुत्र विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. वैभव जलसिंचन योजनेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी, निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपमधून बोरगाव हायस्कूलचे अध्यक्ष संजय पाटील, शेतकरी संघटनेकडून प्रसाद पाटील (बहे), भास्कर कदम (मसुचीवाडी) यांनीही इच्छुक असल्याचे सांगितले आहे. बोरगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीतर्फे सरपंच प्रकाश वाटेगावकर, माजी सरपंच अविनाश खरात (खरातवाडी), सुभाष हुबाले (हुबालवाडी), तर काँग्रेसकडून अ‍ॅड. विजय खरात (खरातवाडी), सचिन सलगर (बोरगाव) यांची नावे चर्चेत आहेत. ताकारी गण मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित झाल्याने येथून अजून तरी कोणत्याही पक्षाच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झालेली नाही.राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे बोरगाव हे दत्तक गाव आहे. या जिल्हा परिषद गटात जयंत पाटील यांचे वर्चस्व २५ वर्षे अबाधित होते. मात्र २00६-0७ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जितेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फायदा उठवत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर २0१२ च्या निवडणुकीत खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षण पडले होते. त्यावेळी पाटील यांनी पत्नी सौ. जयश्री पाटील यांना विजयी करुन पुन्हा एकदा राष्ट्रवादीला चपराक दिली.यावेळी हा मतदारसंघ पुन्हा एकदा खुला झाला आहे. त्यामुळे जितेंद्र पाटील यांनी जय्यत तयारी करुन विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र यावेळी कसल्याही परिस्थितीत बोरगावचा गड सर करायचाच, यासाठी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. आ. पाटील कोणते अस्त्र बाहेर काढणार, याबाबतही चर्चा आहे.बोरगाव गटात ३२ हजार ५४५ मतदान आहे. या मतदारसंघात बोरगाव, ताकारी, बहे, खरातवाडी, दुधारी, मसुचीवाडी, फार्णेवाडी, बनेवाडी, साटपेवाडी, गौंडवाडी व जुनेखेड ही गावे आहेत. मतदार संघाच्या पुनर्रचनेत या गटातील नवेखेडचा समावेश वाळवा गटामध्ये करण्यात आला आहे.खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील यांनी विकास आघाडी करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. यासाठी त्यांच्या बैठकाही झाल्याचे समजते. येथे आघाडीचा उमेदवार आल्यास निवडणूक तिरंगी होणार आहे. याचा फटका कोणाला बसणार, हे निवडणुकीतच ठरणार आहे.मसुचीवाडी प्रकरण कळीचा मुद्दामसुचीवाडी (ता. वाळवा) येथील महाविद्यालयीन युवतीचे छेडछाड प्रकरण, तसेच खेड येथील युवकांकडून झालेली मारहाण यामुळे निवडणुकीवर परिणाम होणार आहे. मसुचीवाडी येथील ग्रामस्थांनी तर गावातील मुलीला झालेल्या त्रासाला कंटाळून मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला होता. दोन्ही गावांतील मतदारांचे मतपरिवर्तन करण्यात नेते यशस्वी होणार का?, यावरही निवडणुकीचा निकाल निर्णायक ठरणार आहे.