शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमध्ये आर्चीसाठी तरु णाईचे ‘झिंगाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 02:26 IST

गर्दी सैराट : पोलिसांकडून सौम्य लाठीमार; उद्घाटनाच्या कार्यक्रमातही अडचणी

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ अवघ्या महाराष्ट्रातील युवावर्गाला वेड लावणाऱ्या ‘सैराट’फेम आर्चीला पाहण्यासाठी कवठेमहांकाळमध्ये सोमवारी गर्दीचा ‘सैराट’ प्रयोग पाहायला मिळाला. पोलिस बंदोबस्तातही गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अभिनेत्री आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर ‘सैराट’वर स्वार झालेली तरुणाई अक्षरश: झिंगाट झाली.कवठेमहांकाळ (जि.सांगली) येथे सोमवारी एका कापड दुकानाचे उद्घाटन रिंकू राजगुरू हिच्या हस्ते ठेवण्यात आले होते. गावात आर्ची येणार, ही बातमी आठवडाभर सोशल मीडियावरून अगोदरच पसरली होती. आर्चीला पाहण्यासाठी कवठेमहांकाळमध्ये सकाळपासूनच सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जत, मिरज, आटपाडी, कर्नाटकातून अनेक तरु णांनी हजेरी लावली होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता रिंकू कार्यक्रमाच्या ठिकाणी आली असता, युवावर्गाने प्रचंड गर्दी केल्याने रिंकूला गाडीतून उतरणेही कठीण झाले. यावेळी गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर रिंकूला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी व तिच्या खासगी रक्षकांनी आणले. तोपर्यंत संपूर्ण गर्र्दी ‘सैराट’मय होऊन ‘झिंग, झिंग, झिंगाट’च्या तालात नाचत होती. गर्र्दी प्रचंड झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करूनही गर्दीला आटोक्यात आणता आले नाही. अर्ध्या तासात मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना गर्दीला पांगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यावेळी रिंकू राजगुरूला मोठ्या प्रयत्नाने पोलिसांनी गर्दीतून वाट काढून देत शहरातून सुखरूप बाहेर काढले. तिची गाडी गर्दीतून बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.शटरबंद उद्घाटनएखाद्या दुकानाचे उद्घाटन झाल्यानंतर त्याचे शटर लगेचच बंद केल्याची घटना कधीच घडल्याचे ऐकिवात नाही; पण सोमवारी रिंकू राजगुरूच्या चाहत्यांच्या अनियंत्रित गर्दीने हा प्रकारही घडविला. गर्दी आवाक्याबाहेर गेल्यानंतर उद्घाटन झालेले कापड दुकान अक्षरश: बंद करावे लागले. रिंकू दुकानात आल्यानंतर शटर बंद करूनच उद्घाटनाचा उर्वरित कार्यक्रम उरकावा लागला. आरसा आणि आठवण‘सैराट’फेम आर्चीला पाहण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे अभिनेत्री रिंकूच्या मोटारीचा आरसा फुटला. मात्र, तिच्या चाहत्यांनी तुटलेल्या आरशाचा काचा मिळेल तशा उचलून तिची आठवण म्हणून अनेकांनी जवळ ठेवून घेतल्या. (वार्ताहर)एका छबीसाठी...रिंकूची एक छबी टिपण्यासाठी गर्दीतील प्रत्येकजण उतावीळ झाला होता. रिंकूने स्टेजवर येऊन हात उंचावल्यानंतर तरुणाईने एकच जल्लोष केला आणि पटापट मोबाईल कॅमेरे बाहेर आले. तिची एक छबी टिपण्यासाठी प्रत्येकाची घाई सुरू होती.