शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘महांकाली’च्या फडात जयंतरावांचा कोयता

By admin | Updated: November 27, 2014 00:21 IST

अंतर्गत राजकारणाची धार : कवठेमहांकाळ तालुक्यातील उसाचा ओघ जत कारखान्याकडेच अधिक

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ -येथील महांकाली कारखान्याच्या फडात माजी मंत्री जयंत पाटील यांचा कोयता जोरात चालला असून, तालुक्यातील उसाचा ओघ ‘राजारामबापू’ने चालविण्यास घेतलेल्या जतच्या कारखान्याला सुरू झाला आहे. जयंतरावांच्या या कोयत्याला अंतर्गत राजकारणाची धार लावल्याचे बोलले जात आहे. यामुळे विजय सगरेंच्या ‘महांकाली’च्या गाळप उद्दिष्टाला ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत.विजय सगरे यांनी गेली २८ वर्षे दुष्काळाशी सामना करत कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचे धुराडे सुरू ठेवले आहे. मागील दोन वर्षात तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी ‘महांकाली’च्या शिवारात आणले आणि तालुक्यात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. या हंगामात तब्बल १०,७५० एकरावर उसाचे क्षेत्र उपलब्ध आहे. महांकाली कारखाना एरव्ही उसासाठी परजिल्ह्यासह परराज्यात भटकंती करत होता, पण आता कार्यक्षेत्रातच उसाचे क्षेत्र मुबलक झाले आहे. यावर्षी ‘महांकाली’ला कार्यक्षेत्रातच साडेतीन लाख टन ऊस गाळपासाठी मिळणार आहे.मात्र ‘महांकाली’च्या सुगीच्या दिवसांना शेजारच्या जत तालुक्यातील राजारामबापू साखर कारखान्याच्या युनिटने हादरा दिला आहे. ‘राजारामबापू’ने जतचा डफळे कारखाना चालवण्यास घेतला असून, या युनिटसाठी ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रातील उसावर कोयता चालविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गाळप उद्दिष्टासाठीही आता ‘महांकाली’स मोठी स्पर्धा करावी लागणार आहे.जतच्या कारखान्याने ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रात ५२ ऊसतोड टोळ्या उतरवल्या आहेत, तर वाहतुकीसाठी ५२ ट्रॅक्टरही कवठेमहांकाळ-जत मार्गावर जोरात धावू लागले आहेत. जत कारखान्याकडे ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रातील दीड हजार एकरावर उसाची नोंद झाली आहे. क्रमपाळी पूर्ण झाल्यानंतर पुरवणीमध्ये उसाची नोंद करून शेतकऱ्यांचा ऊस नेण्यास जत कारखाना प्राधान्य देणार असल्याचे खात्रीशीर व विश्वसनीय वृत्त आहे.‘महांकाली’च्या माध्यमातूनही कार्यक्षेत्रातील ऊस उचलण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याचे कारखान्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात कारखान्याच्या नियोजित कार्यक्रमानुसारच संथगतीने ऊस नेण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे चित्र आहे.दुष्काळी टापूतील महत्त्वाचे उद्योग केंद्र म्हणून परिचित असलेल्या ‘महांकाली’ला जयंतरावांनी दुष्काळी टापूतच जतच्या खडकावरून ‘राजारामबापू’च्या माध्यमातून आव्हान दिले आहे. या उसाच्या स्पर्धेने ‘महांकाली’समोर नवे संकट उभे राहिले आहे.जयंतरावांच्या या कोयत्याला अंतर्गत राजकारणाची तीव्र धार असल्याची चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार ठिकाणी भाजपचे कमळ फुलले, परंतु ते कमळ फुलण्यामागे जयंतरावांचे खतपाणी होते, असे सांगितले जाते. तथापि ‘महांकाली’च्या मैदानात कमळ फुलले नाही, याची सल कदाचित जयंतरावांच्या मनात बोचत असल्यानेच त्यांनी ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रात कोयत्याला राजकीय धार लावल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. काही स्थानिक कार्यकर्तेही जयंतरावांच्या कोयत्याला पाणी लावून धार अधिक तीव्र करत आहेत. तालुक्यातील करोली (टी), हिंगणगाव, कुकटोळी, कोंगनोळी, रामपूरवाडी, सराटी, अग्रण धुळगाव, रांजणी, म्हैसाळ या गावांतून जयंतरावांच्या कोयत्याने सपाटा लावला आहे. सगरे आणि पर्यायाने आर. आर. पाटील यांच्यावर या माध्यमातून कुरघोड्या सुरू आहेत. काहीजण रांजणी, करोली (टी), धुळगाव, कोंगनोळी परिसरातून जत कारखान्याला ऊस पाठविण्यासाठी शेतकऱ्यांना फूस लावत आहेत.महांकाली व जत कारखान्याने अद्याप दर जाहीर केलेला नाही, तरीही ऊसतोड मात्र जोमात सुरू आहे. ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना शेतकरी देऊ लागल्याने याचा परिणाम ‘महांकाली’वर होणार आहे. गेली २८ वर्षे दुष्काळाशी टक्कर देत हा कारखाना गाळप उद्दिष्ट साध्य करीत आला आहे. यंदाही इतर क्षेत्रातून, कर्नाटकातून ऊस आणावा लागल्यास तो आणून उद्दिष्ट पूर्ण केले जाईल.- मनोज सगरे, प्रभारी कार्यकारी संचालक, महांकाली कारखानाया हंगामात राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या जत युनिटचे चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, कवठेमहांकाळ तालुक्यातील दीड हजार एकरातील उसाची नोंद जत कारखान्याकडे झाली आहे. पुरवणीतही ऊस नोंद करण्यात येईल व शेतकऱ्यांचा ऊस नेण्यात येईल.- प्रशांत पाटील, शेती अधिकारी, जत कारखानाकळीचा मुद्दा महांकाली कारखान्याची उभारणी विजय सगरे यांचे वडील नानासाहेब सगरे यांनी केली. नानासाहेब सगरे हे राजारामबापूंचे अनुयायी मानले जातात. राजारामबापूंनी नानासाहेबांना मोठी मदत केल्यानेच कारखान्याच्या परिसराला ‘राजारामबापूनगर’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र आता विजय सगरे यांनी जयंतरावांचा हात सोडून आर. आर. पाटील यांचा हात धरला आहे. त्यामुळेच राजारामबापूंचे पुत्र असलेल्या जयंत पाटील यांनी या कारखाना कार्यक्षेत्रात कोयता जोरात चालवला असल्याचे सांगितले जाते.