शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव व माझी चर्चा नाही : कदम

By admin | Updated: July 8, 2015 23:53 IST

बाजार समिती निवडणूक : मदनभाऊंनी सोबत यायचे की नाही हे ठरवावे!

सांगली : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्याशी आपली कसलीही चर्चा झालेली नाही. विक्रम सावंत यांनाही आपण चर्चेसाठी कधी पाठविलेले नाही, असे सांगत काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांनी बुधवारी जयंतरावांशी आघाडीची शक्यता फेटाळून लावली. बाजार समितीबाबत जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्याबद्दल कदम यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मी कशाला चर्चा करू. जयंत पाटील यांच्याशी कसलीही चर्चा झालेली नाही. एका कार्यक्रमात आमची भेट झाली होती. पण तिथेही निवडणुकीवर चर्चा झाली नाही. जतचे विक्रम सावंत यांना आपण त्यांच्याकडे पाठविलेले नाही. या साऱ्या अफवा आहेत. माजी मंत्री मदन पाटील यांच्या भूमिकेबद्दल कदम म्हणाले की, त्यांनी काँग्रेससोबत रहायचे का नाही, हे ठरवावे. मध्यंतरी मिरजेतील जागांबाबत मदनभाऊ व विशाल पाटील यांनी एकत्रित निर्णय घेण्याची सूचना केली होती, पण त्यानंतर काय झाले, हे मला माहीत नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा विषय संपलेला आहे. आम्ही बाजार समितीची निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे लढविणार आहोत. जे सोबत येतील, त्यांनाही बरोबर घेऊ. कोणी कुठे जायचे, ते त्यांनीच ठरवावे, असा टोलाही लगाविला. राज्यातील भाजप सरकारवर टीका करीत कदम म्हणाले की, राज्यातील जनतेचा कल बदलू लागला आहे. मोदींची लाट संपली आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील निकाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. येत्या पावसाळी अधिवेशनातही काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित सरकारच्या कारभारावर हल्ला चढविणार आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा झाली आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद, जिल्हा बॅँकेत लक्ष घालूजिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी बँकेत पतंगरावांनी यावे, असे निमंत्रण दिले होते. त्याबद्दल छेडले असता, कदम म्हणाले की, जिल्हा बँक ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. बँकेच्या कारभाराची कधीही माहिती घेऊ शकतो. कर्जप्रकरणावरून काँग्रेसच्या संचालकांनी विरोध केला आहे. त्याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांकडून माहिती घेणार आहोत. केवळ जिल्हा बँकच नव्हे, तर जिल्हा परिषदेतही यापुढे लक्ष घालणार असल्याचे ते म्हणाले. आनंदच आहे...जत तालुक्यातील ४२ गावांतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सत्ताधारी आमदार, खासदारच सहभागी झाले होते. त्यांनीच सरकारविरोधात मोर्चा काढला. हा आनंदच आहे. त्यातून जिल्ह्याला काहीतरी मिळावे, असा टोला लगाविला.