शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राखीवमधून जयंत पाटील यांचेच समर्थक आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : ‘कृष्णे’च्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती-जमाती राखीवमधून तिन्ही पॅनलचे उमेदवार वाळवा तालुक्यातील आहेत. हे तिघेही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : ‘कृष्णे’च्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती-जमाती राखीवमधून तिन्ही पॅनलचे उमेदवार वाळवा तालुक्यातील आहेत. हे तिघेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे समथर्क मानले जातात. आता या तिघांमधून कोण बाजी मारणार, याकडे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील धनगर बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.

सहकार पॅनलचे अविनाश खरात आणि संस्थापक पॅनलचे नितीन खरात हे खरातवाडी (ता. वाळवा) येथील ऊस उत्पादक सभासद आहेत. या दोघांचा ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समितीपर्यंत राजकीय प्रवास आहे. अविनाश खरात हे माजी सरपंच असून त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. कृष्णेच्या गत निवडणुकीत रयत पॅनलकडून त्यांची उमेदवारी होती. यावेळी मात्र त्यांच्याच समाजातील मातब्बर नेत्यांच्या शिफारशीने अविनाश खरात यांना सहकार पॅनलकडून उमेदवारी मिळाली आहे, तर संस्थापक पॅनलनेही सहकारवर कडी करत कृष्णेचे माजी संचालक नितीन खरात यांना उमेदवारी देऊन अविनाश खरात यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोघेही जयंत पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली खरातवाडी येथे आपले राजकीय अस्तित्व टिकवून आहेत.

सहकार आणि संस्थापक पॅनलला शह देण्यासाठी आणि तोडीस तोड म्हणून रयत पॅनलने याच समाजातील इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी दिल्याने आता राखीवमध्ये चुरस निर्माण झाली आहे. मलगुंडे हे सध्या विद्यमान नगरसेवक आहेत. धनगर समाजात त्यांचा संपर्क आहे. इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात मलगुंडे यांचा दबादबा आहे. ते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पालिकेच्या राजकारणात नागरिक संघटना आणि शहर सुधारणा या दोन संघटना होत्या. मलगुंडे हे शहर सुधारणाकडून नगरसेवक होते.

नगराध्यक्ष निवडीवेळी अटीतटीच्या संघर्षात नागरिक संघटनेचे एक मत फोडून मलगुंडे नगराध्यक्ष झाले. प्रारंभीपासून कृष्णेच्या राजकारणात मलगुंडे यांनी यशवंतराव मोहिते, मदन मोहिते यांना साथ दिली आहे. यावेळच्या निवडणुकीत मदन मोहिते सहकार पॅनलमध्ये आहेत, तर मुलगंडे यांंनी मोहिते घराण्यावरील निष्ठा कायम ठेवली आहे. त्यामुळेच डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी देऊन कृष्णेच्या निवडणुकीत रयतेच्या झेंड्याला ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे.

चौकट

नेत्यांची भूमिका तटस्थ

तिन्हीही उमेदवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चिमण डांगे यांचे नेतृत्व मानतात. त्यांना राजकारणात मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच नेत्यांनी आपली भूमिका तटस्थ ठेवून कृष्णेच्या राजकारणात समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.