शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील, वैभव शिंदे येणार एकाच व्यासपीठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:14 IST

आष्टा तालुका होण्यासाठी हे पहिले पाऊल पडले. वैभव शिंदे यांना भाजप शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक पद दिले. अशा परिस्थितीतही आष्टा पालिकेतील सत्तेतील विलासराव शिंदे यांना मानणारा गट जयंत पाटील यांच्यासोबतच राहिला. विधानसभा निवडणुकीत या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला.

आष्टा : आष्टा येथे माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन शुक्रवार दि. ७ रोजी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने विलासराव शिंदे यांचे पुत्र व भाजपचे जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे व मंत्री जयंत पाटील एकत्र येत आहेत. यामुळे वैभव शिंदे यांची राष्ट्रवादीत घरवापसी होऊन बेरजेचे राजकारण सुरू होणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आष्टा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि. ७ रोजी विलासराव शिंदे यांच्या ह्यशक्तिस्थळह्ण या स्मारकाचे भूमिपूजन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते होत आहे. वैभव शिंदे व विशाल शिंदे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत बागणी मतदारसंघातून वैभव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली; मात्र माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी भाजपमधून, तर संभाजी कचरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यात अटीतटीची निवडणूक होऊन मोठा राजकीय संघर्ष रंगला आणि संभाजी कचरे विजयी झाले.

वैभव शिंदे यांचा विजय निश्चित आहे असे शिंदे गटाला वाटत होते; मात्र संभाजी कचरे यांच्या विजयानंतर जयंत पाटील गटाने सहकार्य केले नसल्याची भावना निर्माण झाली. वैभव शिंदे यांनी पक्षाचा त्याग करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आष्टा परिसर व तालुक्यात भाजप वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

आष्टा शहरात अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू करावे, आष्टा तालुका, एमआयडीसी व पालिकेला भरघोस निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले. यापैकी आष्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर करून ते सुरू झाले. यामुळे विलासराव शिंदे यांचे सुमारे चाळीस वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले. आष्टा तालुका होण्यासाठी हे पहिले पाऊल पडले.वैभव शिंदे यांना भाजप शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक पद दिले. अशा परिस्थितीतही आष्टा पालिकेतील सत्तेतील विलासराव शिंदे यांना मानणारा गट जयंत पाटील यांच्यासोबतच राहिला. विधानसभा निवडणुकीत या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला.

दरम्यान, माजी आमदार विलासराव शिंदे यांचे निधन झाले. या काळात भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील यांनीही शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली