शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

वाळवा-शिराळ्यामध्ये जयंत फॅक्टरला धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 16:11 IST

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत वाळवा-शिराळा तालुक्यातील जयंत फॅ क्टरचा   आलेख ढासळत आहे. भाजप-शिवसेनेने इतर गटांची ताकद घेऊन राष्टवादीविरोधात सुरू केलेली मोर्चेबांधणी यशस्वीतेच्या मार्गावर आहे. हातकणंगले मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांना आमदार जयंत पाटील यांची

ठळक मुद्दे याचे श्रेय मात्र रयत क्रांती संघटनेचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतले आहे.   शिवसेनेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांचे पानिपत केले

अशोक पाटील  । इस्लामपूर : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत वाळवा-शिराळा तालुक्यातील जयंत फॅ क्टरचा   आलेख ढासळत आहे. भाजप-शिवसेनेने इतर गटांची ताकद घेऊन राष्टवादीविरोधात सुरू केलेली मोर्चेबांधणी यशस्वीतेच्या मार्गावर आहे. हातकणंगले मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांना आमदार जयंत पाटील यांची सलगी महागात पडली आहे. याचे श्रेय मात्र रयत क्रांती संघटनेचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतले आहे.  शिवसेनेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांचे पानिपत केले. वाळवा-शिराळा तालुक्यात आजही जयंत फॅक्टरची ताकद अबाधित आहे. राष्टÑवादीने शेट्टी यांना ३० हजाराहून मताधिक्य दिले आहे. यामध्ये गत निवडणुकीपेक्षा मतांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत आ. पाटील काठावर पास झाले. इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीनंतर राष्टÑवादीविरोधी असलेल्या नेत्यांतील कुरघोड्या शिवसेनेच्या पथ्यावर पडल्या आहेत. राष्टÑवादीतून विकास आघाडीमार्फत भाजपमय झालेले नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या वर्चस्वाला खोत यांनी खो दिला. शेट्टी यांच्याविरोधात खोत यांचे नाव आघाडीवर असताना, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले धैर्यशील माने यांना खासदारीकीची लॉटरी लागली. त्याचे श्रेय घेऊन खोत यांनी आता जयंत पाटील यांनाच टार्गेट करण्याचा डाव आखला आहे. 

आगामी विधानसभेसाठी इस्लामपूर मतदारसंघातून आ. जयंत पाटील रिंगणात असतील. त्यांच्याविरोधात भाजपमधून नगराध्यक्ष निशिकांत पाटील, महाडिक गटाचे राहुल महाडिक, हुतात्मा संकुलाचे गौरव नायकवडी,  तर हा मतदारसंघ शिवसेनेसाठी       आहे, असा दावा करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हेही  स्वप्ने बघू लागले आहेत. शिराळा मतदारसंघात राष्टवादीतून मानसिंगराव नाईक यांनी यापूर्वीच उमेदवारी निश्चित केली आहे, तर भाजपमधून आ. शिवाजीराव नाईक यांनीही लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाडिक गटाचे सम्राट महाडिक हेही शिराळा मतदारसंघातून उत्सुक आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालElectionनिवडणूकJayant Patilजयंत पाटील