शिरगुप्पी : क्रेन व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात ऐगळी येथील जवान माणिक प्रभू सदाशिव बिरादार (वय ३०) हे ठार झाले. ते सिक्कीम येथे सेवा बजावत होते. सुट्टीनिमित्त ते गावी आले होते. बिरादार आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना, ऐगळी क्रॉसनजीक येताच क्रेन चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांनी दुचाकीला धडक दिली. या धडकेत बिरादार जागीच ठार झाले. अपघातानंतर क्रेनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या अपघाताने ऐगळी गावावर शोककळा पसरली आहे. बिरादार यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेची नोंद ऐगळी पोलिसात झाली आहे. (वार्ताहर)
अपघातात जवान ठार
By admin | Updated: November 29, 2015 01:00 IST