शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जतच्या ‘मनरेगा’ घोटाळ्याची व्याप्ती मोठी

By admin | Updated: February 10, 2017 00:02 IST

एस. चोक्कलिंंगम् : प्राथमिक अहवाल मिळाला; जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश

सांगली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मधील निधीतील जत तालुक्यातील कामांमध्ये गैरकारभार झाल्याचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे अधिकाऱ्यांना याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी विभागीय आयुक्त सांगलीत आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, सहाय्यक आयुक्त रश्मी खांडेकर, सहाय्यक आयुक्त सोनाली घुले, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, उपायुक्त संभाजी लांगोरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी, किरण जाधव, रविकांत आडसूळ आदी उपस्थित होते.विभागीय आयुक्त पुढे म्हणाले की, जत तालुक्यातील मनरेगा योजनेतील निधी हा लाभार्थींच्या खात्यावरच जाणे अपेक्षित आहे. अन्य व्यक्तींच्या खात्यावर निधी वर्ग होणे ही गंभीर बाब आहे. बोगस कामेही प्राथमिक चौकशीत दिसत आहेत. या घोटाळ्यामध्ये जे दोषी असतील, त्यांना सोडणार नाही. प्रत्येकावर निश्चित कारवाई केली जाणार आहे. या गैरकारभाराची व्याप्ती लक्षात घेऊनच जिल्हाधिकाऱ्यांना मनरेगातील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या अहवालानंतरच गैरव्यवहारामध्ये कुणाचा आणि किती सहभाग आहे, हे स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)