जत : भाजपच्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवड करण्यासाठी शुक्रवार, ९ जुलैरोजी सकाळी ११ वाजता नगरपालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड गुगल मीटद्वारे आयोजित केली आहे.
स्वीकृत पदासाठी खोकीदार संघटनेचे अध्यक्ष गौतम ऐवळे, भाजपचे शहराध्यक्ष आण्णा भिसे यांचे लहान बंधू मिथुन भिसे, चंद्रकांत उर्फ पापा कुंभार व माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू संग्राम जगताप यांच्या नावाची चर्चा होती. स्वीकृत नगरसेवक उमेदवार निश्चित करण्यासाठी जगताप यांनी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिक्षण सभापती प्रकाश माने, नगरसेवक प्रमोद हिरवे, विरोधी पक्षनेते जयश्री मोटे, नगरसेविका दीप्ती सावंत, गटनेत्या श्रीदेवी सगरे, माजी नगरसेवक उमेश सावंत उपस्थित होते. जगताप यांनी नगरसेवकांची मते जाणून घेतली. उमेश सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवड होणार आहे.