शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्याचे विभाजन रखडले

By admin | Updated: September 4, 2014 00:03 IST

नेत्यांचे दुर्लक्ष : तीस वर्षांपासून प्रश्न लालफितीत

गजानन पाटील - दरीबडची -जिल्ह्याच्या पूर्वेकडील व महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेला जत तालुका सतत दुष्काळ, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई, रस्त्यांचा अनुशेष यामुळे विकासापासून वंचित राहिला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा जतचे भौगोलिक क्षेत्र सर्वाधिक आहे. परंतु लोकसंख्या विरळ आहे. तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुका निर्मितीचा प्रश्न गेल्या ३० वर्षांपासून लालफितीच्या कारभारात धूळ खात अडकून पडला आहे. नवीन तालुक्याचे ठिकाण संख की उमदी हा बऱ्याच वर्षांपासूनचा वाद आहे.जिल्ह्यामध्ये जत तालुका विस्ताराने मोठा तालुका आहे. तालुक्याचा पूर्व भाग व दक्षिण भाग कर्नाटक सीमेलगत आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी, विजापूर जिल्ह्यातील इंडी, विजापूर या तीन तालुक्याच्या सीमा जत तालुक्यात जोडलेल्या आहेत. तालुक्यात १२२ गावे आहेत. २५६ वाड्यावस्त्या व ११७ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र २ लाख २५ हजार ८२८ हेक्टर आहे. प्रमुख रस्त्यांची लांबी १२० कि. मी., तर दक्षिण-उत्तर लांबी ६५ कि. मी. आहे. तालुक्याचे विभाजन करावे, या मागणीसाठी संख, उमदी, माडग्याळ या तीन प्रमुख गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी धरणे, आंदोलन, उपोषण, रस्ता रोको या मार्गांचा अवलंब करून शासकीय पातळीवर आपला आवाज उठविला. परंतु प्रशासकीय पातळीवर लोकप्रतिनिधींकडून त्याचा सतत पाठपुरावा होत नसल्यामुळे शासन दरबारी तालुका विभाजनाचा प्रश्न ३० वर्षांपासून धूळ खात पडला आहे.विस्ताराने तालुका मोठा असल्याने शासनाकडून येणारा निधी अपुरा पडतो. त्यामुळे अनेक विकास कामे निधीअभावी रखडली आहेत. शासकीय योजना, पिण्याचे पाणी, रस्ता, वीज हे प्रश्न रखडले आहेत. निधीअभावी नागरी सुविधांचा प्रश्न रखडल्याने तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी १९८२ पासून केली जात आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सांगली, आष्टा, पलूस व संख या नवीन तालुक्यांचा प्रस्ताव १९८२ मध्ये शासनाकडे सादर केला. त्यापैकी पलूस तालुक्याची निर्मिती १९९९ मध्ये करण्यात आली. तसेच कडेगाव तालुक्याचा प्रस्ताव शासनाकडे नसताना देखील राजकीय पाठबळाच्या जोरावर तालुक्याची निर्मिती झाली; मात्र जत तालुका विभाजनाचा प्रश्न रेंगाळला आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या ४७ गावांचा समावेश न्यायमूर्ती महाजन आयोगाच्या अहवालानुसार कर्नाटक राज्यात होणार आहे. बहुतांश नागरिकांची बोलीभाषा कन्नड आहे. प्रशासकीय कामासाठीच येथील नागरिक जत येथे येतात. अन्यथा त्यांचे दैनंदिन व्यवहार विजापूर येथे होत असतात.जिल्ह्याचे एक तृतीयांश क्षेत्रफळ जत तालुक्याने व्यापले आहे. भौगोलिक विस्तार पाहता पूर्व भागामध्ये गावांची संख्या ६९ आहे. तालुक्यापासून ही गावे ६० ते ६५ कि. मी. अंतरावर आहेत. दैनंदिन कामासाठी, शासकीय कामासाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत आहे. येथे आल्यानंतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसतील, तर त्यांना अनेकवेळा हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा याचा अपव्यय होतो. दोन गावातील अंतर ५ कि. मी. व जास्तीत-जास्त अंतर १५ कि. मी. इतके आहे. तालुका विभाजन करणे आवश्यक आहे.