शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जनसुराज्य-रयत क्रांती एकत्र! राजकीय हालचाली गतिमान : उमेदवार देण्यासाठी तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:01 IST

हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यासाठी जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांनी मातोश्रीवर धडक मारली आहे. परंतु अद्यापही त्यांना यश आलेले नाही. खोत यांचा विचार झाला नाही तर विधानसभेला

ठळक मुद्देजनसुराज्य पक्ष आणि रयत क्रांती संघटना एकत्रित येऊन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या

अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यासाठी जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांनी मातोश्रीवर धडक मारली आहे. परंतु अद्यापही त्यांना यश आलेले नाही. खोत यांचा विचार झाला नाही तर विधानसभेला जनसुराज्य पक्ष आणि रयत क्रांती संघटना एकत्रित येऊन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या मोजक्या जागा लढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून खासदार राजू शेट्टी यांनी दोनवेळा विजय मिळवला आहे. आताही हातकणंगलेची जागा काँग्रेस आघाडीकडून खासदार शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात आली आहे. शेट्टी यांच्याविरोधात भाजप-शिवसेनेकडून रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी समर्थक करत आहेत.

गेल्या वर्षभरापासून खोत यांनी मतदारसंघात दौरे केले आहेत. खासदार शेट्टी यांच्याविरोधात वारणा समूहाचे नेते विनय कोरे यांनी लढावे, यासाठीही खोत यांनी प्रयत्न चालविले होते. परंतु कोरे यांनी याला स्पष्टपणे नकार दिला. हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. त्यातूनच आता कोरे यांनी खोत यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे.

कोरे यांच्या विधानसभा मतदारसंघात खोत यांनी विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. यामुळे हातकणंगले मतदारसंघात रयत क्रांती आणि जनसुराज्य पक्ष एकत्रितपणे दिसू लागले आहेत. लोकसभेला जमले नाही, तर दोन्ही पक्षांचे अस्तित्व टिकविण्यासाठी विधानसभेला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मोजक्या जागा लढविण्याबाबत खोत आणि कोरे यांच्यात खलबते सुरू झाली आहेत. 

हातकणंगलेतून खा. राजू शेट्टी यांच्याविरोधात रयत क्रांती संघटना निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. परंतु युतीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वारणा खोऱ्यात विनय कोरे यांनी सहकाराच्या माध्यमातून मोठी ताकद उभी केली आहे. आमचेही कार्यकर्ते या भागात सक्रिय आहेत. त्यामुळे आम्ही मिळून विधानसभेची तयारी करणार आहोत.- सागर खोत, युवा नेते रयत क्रांती संघटना. 

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली