शिराळा : जायंट्स गुप ऑफ बत्तीस शिराळा सहेली आयोजित भव्य किल्ला महोत्सव स्पर्धा २०२० चा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यामध्ये प्रथम क्रमांक जंजिरा किल्ला (चांदणी चौक, नाटोली) यांनी पटकाविला. विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
दि्वतीय क्रमांक विभागून : माळी गल्ली युवा मंच शिराळा व गायकवाड गल्ली रायगड किल्ला शिराळा. तिसरा क्रमांक : विश्वजित पाटील शिराळा, चतुर्थ क्रमांक : जगदंब ग्रुप शिराळा, सहावा क्रमांक : भागाईवाडी ग्रुप, सातवा क्रमांक : साहिल रमजान मुल्ला आरळा, आठवा क्रमांक : भटवाडी ग्रुप, नववा क्रमांक : रणवीर विक्रम यादव, दहावा क्रमांक : भटवाडी.
सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले.
यावेळी नगरसेविका नेहा सूर्यवंशी, वैभव गायकवाड, विठ्ठल नलवडे, दीपक शिंदे, दिनेश हसबनीस, राहुल गायकवाड यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून धनंजय देशपांडे, नूतन साठे, अश्विनी वारे, संगीता खटावकर, मीनाक्षी कदम, रोहिणी मिरजकर, जायंट्स गुप ऑफ बत्तीस शिराळा सहेली अध्यक्षा आणि अनिता धस यांनी काम पाहिले.