शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपन्यांचे खासगीकरण रोखणे अशक्यच : गमरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:56 IST

वीज कंपन्यांचे खासगीकरण उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, ते आपण रोखूच शकत नाही. या खासगीकरणाची अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भीती बाळगण्याची काहीच गरज नाही. गुणवत्तेच्या जोरावर खासगीकरणावर चांगल्या पध्दतीने मात करता येईल, असे प्रतिपादन महापारेषणचे कार्यकारी संचालक सुमित गमरे यांनी केले.

ठळक मुद्देवीज कंपन्यांचे खासगीकरण रोखणे अशक्यच : गमरे स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन

सांगली : वीज कंपन्यांचे खासगीकरण उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, ते आपण रोखूच शकत नाही. या खासगीकरणाची अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भीती बाळगण्याची काहीच गरज नाही. गुणवत्तेच्या जोरावर खासगीकरणावर चांगल्या पध्दतीने मात करता येईल, असे प्रतिपादन महापारेषणचे कार्यकारी संचालक सुमित गमरे यांनी केले.सांगलीत तीन दिवस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य अधिवेशन सुरू झाले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी महापारेषणचे महाव्यवस्थापक सुधीर वानखेडे, एम.एस.ई. वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा, कार्याध्यक्ष सी. एन. देशमुख, सरचिटणीस कृष्णा भोयर, अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव आदीसह हजारो कर्मचारी उपस्थित आहेत.सुमित गमरे म्हणाले, विजेबाबत देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. शेतकरी व कामगार देशाचा कणा असून तो टिकला तरच देश पुढे जाणार आहे. संघटना गेली ६० वर्षे अविरत वीज कामगारांच्या हितासाठी लढत आहे, ही बाब अभिमानाची आहे.

सध्या विद्युतचे रूपांतर ऊर्जेत झाले आहे. आपणसुध्दा ऊर्जेप्रमाणे काम करणे गरजेचे आहे. संघटनेच्या प्रयत्नामुळेच पगारवाढ झाली आहे. कामगार व अभियंत्यांच्या चांगल्या कामामुळे तिन्ही कंपन्या नफ्यात आहेत. तिन्ही कंपन्यांच्या एकूण महसुलाच्या ३० टक्के महसूल कर्मचारी पगारावर खर्च होतो.

सध्या देशात सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करण्याचे धोरण सुरू आहे. हे थांबविणे आपल्या हातात नाही. पण, त्याची कामगार, अभियंत्यांचे हित साधण्यासाठी कशापध्दतीने अंमलबजावणी करायची, हे आपण ठरवू शकतो. खासगीकरणाची भीती न बाळगता गुणवत्तेने त्यास सामोरे जाण्याची गरज आहे. लवकरच महापारेषण कंपनीत नवीन आकृतिबंध लागू करण्यात येणार आहे. आकृतिबंध लागू करताना कामगारांचेच हित जोपासले जाईल.

शर्मा म्हणाले, सतत होणारी वीज दरवाढ रोखण्याकरिता उपाययोजना, वीज कंपन्यांचे खासगीकरण व फ्रेन्चाईसीकरण रोखणे, वीज कंपन्यातील ३२००० कंत्राटी, आऊटसोर्सिंग कामगारांना सेवेत कायम करणे, या प्रश्नांवर आवाज उठविण्यात येणार आहे. यासाठी कामगारांनी संघटित लढा देण्याची गरज आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली