शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

सुनावणीपूर्वी निम्मी रक्कम भरणे अनिवार्य

By admin | Updated: March 19, 2015 00:01 IST

वाढीव घरपट्टीचा वाद : अपिलाबाबत इस्लामपूर मुुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

इस्लामपूर : महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील कलम ११९ नुसार शहरातील २००६-०७ पासून १४-१५ पर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या ४ हजार ३४३ मालमत्ताधारकांना कराच्या नोटिसा दिल्या आहेत. शासननिर्णयानुसार ५० टक्के रक्कम भरुन अपील दाखल करावे अथवा सुनावणीपूर्वी ती रक्कम भरणे अनिवार्य आहे, असे आज (बुधवारी) इस्लामपूर पालिकेचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी स्पष्ट केले.शहरात पालिकेने दिलेल्या वाढीव घरपट्टीच्या नोटिसांवर वादळ उठलेले असताना मुख्याधिकारी देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची बाजू मांडली. ते म्हणाले की, मुळात करमूल्य ठरवणे, त्याची यादी करणे व त्यानुसार नोटिसा पाठवणे ही प्रशासकीय बाब आहे. त्यामध्ये सत्ताधारी अथवा विरोधी पदाधिकाऱ्यांचा सहभाग असत नाही. नगररचना विभागाचे सहायक संचालक हे कर निर्धारण अधिकारी असतात. त्यांच्याकडूनच हे करमूल्य ठरवले जाते. त्यानंतर आलेल्या नोटिसांवर त्यांच्यासमोर पहिल्या अपिलाची सुनावणी होते. त्यावेळी करमूल्य भरले नाही तरी चालते, मात्र प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीसमोर ज्यावेळी सुनावणी होईल, त्यावेळी करापैकी ५० टक्के रक्कम भरणे बंधनकारक ठरते.ते म्हणाले, ज्या हरकतदारांनी ५० टक्के रक्कम भरली आहे, त्यांची अपिले सुनावणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. शहरात आजअखेर १७ हजार ९१ एकूण मालमत्ता आहेत. त्यापैकी ज्यांनी वापरात बदल, सुधारित बांधकाम, नवीन बांधकाम केले, अशा ४ हजार ३४३ जणांना नोटिसा दिल्या आहेत. जुन्या मालमत्ताधारकांना ही नोटीस दिलेली नाही. मात्र जर नजरचुकीने अशी नोटीस दिली गेली असल्यास त्याची खातरजमा करुन ती रद्द केली जाईल.देशमुख म्हणाले, स्थानिक स्वराज संस्था या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत ही भूमिका असल्याने शासनाने त्यादृष्टीने २०१० नंतर अनेक कायद्यात बदल केले आहेत. भविष्यात मिळणारी अनुदाने ही वसुलीशी निगडित असणार आहेत. त्यामुळेच ६-७ वर्षांत झालेल्या नव्या मालमत्तांवर कर आकारणी झाली पाहिजे. नागरिकांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधून ही प्रक्रिया समजून घेऊन सहकार्य करावे. (वार्ताहर)नगररचना विभागाकडूनच कर निर्धारणमुख्याधिकारी नीलेश देशमुख म्हणाले की, शहरातील ज्या हरकतदारांनी ५० टक्के रक्कम भरली आहे, त्यांची अपिले सुनावणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. नगररचना विभागाचे सहायक संचालक हे कर निर्धारण अधिकारी असतात. त्यांच्याकडूनच हे करमूल्य ठरवले जाते. त्यामध्ये सत्ताधारी अथवा विरोधी पदाधिकाऱ्यांचा सहभाग असत नाही. त्यानंतर आलेल्या नोटिसांवर त्यांच्यासमोर पहिल्या अपिलाची सुनावणी होते.