शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर नगरपालिका बिनविरोधचा प्रस्ताव

By admin | Updated: July 5, 2016 00:04 IST

विजयभाऊंची माहिती : अगोदर राष्ट्रवादीतील गटबाजी संपविण्याचा राहुल महाडिक यांचा सल्ला

अशोक पाटील --इस्लामपूर -आगामी नगरपालिका निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मी माझ्या वैयक्तिक भावनेतून मांडत आहे, असे मत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. याउलट राष्ट्रवादीतील गट एकत्र करा, नंतर बिनविरोधची भाषा बोला, असा सल्ला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक यांनी दिला. येथे सत्ताधारी राष्ट्रवादीविरोधात सर्व पक्ष एकत्र आले, तर विरोधी गटाची ताकद वाढते. जर विरोधकांत एकी नसेल, तर राष्ट्रवादीचे फावते. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि विरोधी गटातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. सभागृहात विरोधी पक्षनेते विजय कुंभार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आणि कपिल ओसवाल हे तीनच नगरसेवक विरोधी बाकावर आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी केवळ कागदोपत्री विरोध दर्शविला आहे. त्यामुळेच वर्षभरापासून पक्षप्रतोद पाटील यांनी, आगामी निवडणुकीत विरोधक औषधालाही ठेवणार नाही, अशी भाषा सुरू केली होती. आता मात्र त्यांनी भूमिका बदलली आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने हे पद खुले झाल्यास विजयभाऊ पाटील नगराध्यक्ष होतील, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.गेल्या ३0 वर्षाहून अधिक काळ नगराध्यक्ष कोणीही असला तरी, नगराध्यक्ष दालनात, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या आसनांच्या मधील खुर्चीचा मान पाटील यांच्यासाठी दिला गेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे नगराध्यक्षपद असो वा नसो, तेच महत्त्वाचे निर्णय घेतात. आगामी काळात नगराध्यक्षपद मिळो वा न मिळो, विरोधकांना निवडणुकीपूर्वीच गारद करण्यासाठी त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा नवीन फंडा काढला असल्याची चर्चा आहे.महाडिक युवा शक्तीचे राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांची मात्र भूमिका वेगळी आहे. विजयभाऊ पाटील यांनी अगोदर राष्ट्रवादीत असलेले गट एकत्र करावेत, त्यानंतरच बिनविरोधची भाषा करावी, असा सल्ला महाडिक यांनी दिला आहे. आगामी निवडणुकीसाठी विरोधक एकत्रित होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. विस्तारानंतर ते इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. निवडणुकीत येणार रंगतसम्राट महाडिक यांनी जलाल मुल्ला आणि अ‍ॅड. जावेद मगदूम यांना ताकद देऊन इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. याला आव्हान म्हणून आता विद्यमान नगरसेवक पिरअल्ली पुणेकर यांनीही इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या दोघांनाही मागे टाकून एम.आय.एम.चे शाकीर तांबोळी यांनी यापूर्वीच इफ्तार पार्टी केली आहे. त्यामुळे इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत रंगत येणार आहे.