शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 19:18 IST

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे. निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे आणि जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी कामाला लागावे, असा कानमंत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे आणि पवार यांच्यात खलबते झाली.

ठळक मुद्देया इच्छुकांव्यतिरिक्त काहींनी शिवसेनेच्या तिकिटासाठी कोलांटउड्या घेण्याचीही तयारी केली आहे.

अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे. निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे आणि जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी कामाला लागावे, असा कानमंत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे आणि पवार यांच्यात खलबते झाली. त्यामुळे या मतदारसंघात इच्छुक असलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांनी शिवसेनेशी संपर्क सुरू केला आहे.

शुक्रवार, दि. १४ रोजी उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक ह्यमातोश्रीह्णवर आयोजित केली आहे. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भाजप-शिवसेना युती होणार आहे. दोन्ही पक्षांनी समान १३५ जागा लढविण्याचा, तर इतर १८ जागा घटकपक्षांना देण्याचा निर्णय घेतला आहे. इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने इतर पक्षांतील नेते अस्वस्थ झाले आहेत. महाडिक गटाचे राहुल महाडिक येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. सध्या ते कोणत्याही पक्षात नाहीत. त्यामुळे त्यांनी ह्यमातोश्रीह्णवरील वाºया वाढवल्या आहेत.

आता नव्याने इच्छुकांमध्ये पृथ्वीराज पवार यांची भर पडली आहे. त्यांनीही शिवसेनेच्या तिकिटावर दावा केला आहे. हुतात्मा संकुलाचे युवा नेते गौरव नायकवडी यांनी सर्व पक्षांना समान अंतरावर ठेवले आहे. त्यांना भाजपने ह्यआॅफरह्ण दिली असली तरी, इस्लामपूरमधून निवडणूक लढवायची झाल्यास त्यांना शिवसेना प्रवेश अनिवार्य राहील. या इच्छुकांव्यतिरिक्त काहींनी शिवसेनेच्या तिकिटासाठी कोलांटउड्या घेण्याचीही तयारी केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली