शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

इस्लामपुरात परिवर्तन लाट

By admin | Updated: November 2, 2016 00:17 IST

सदाभाऊ खोत : जनतेला पालिका सत्तेत बदल हवा आहे

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत जनतेला बदल हवा आहे. जनतेच्या मनात सत्ता परिवर्तन करण्याची सुप्त लाट आहे. गेल्या ३१ वर्षांच्या सत्ता काळातून जनतेला पिळून मिळवलेला सत्ताधाऱ्यांचा काळा पैसा बाहेर येणार आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या या काळ्या पैशाला भीक न घालता जनता विकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे राहील, असा विश्वास कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खोत म्हणाले, या निवडणुकीसाठी विकास आघाडीत सर्वांना सामावून घेतले आहे. अपक्ष उमेदवारांशी चर्चा करीत आहोत. त्यातून सन्मानजनक तोडगा निघेल. विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होईल. सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार, जनतेला वेठीस धरुन काम करण्याची पद्धत, खुंटलेला विकास अशा सर्व समस्यांवर मतदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांनी पैशाची केलेली वारेमाप उधळणही जनतेने डोळ्यांनी पाहिली आहे. खोत म्हणाले, राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांच्या दहशतीमुळे व्यापारी, सर्वसामान्य जनता, विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहराचा विस्तार करताना अपेक्षित विकास साधण्याची दृष्टी सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे गुंठेवारी व उपनगरातील जनजीवन बकाल बनले आहे. तेथील घरे बांधून राहिलेले नागरिक कारवाईची टांगती तलवार घेऊन राहात आहेत. शहरात सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यावरच सावकारीचे दुष्टचक्र फोफावले आहे. त्यातून तरुण आत्महत्या करीत आहेत. राहत्या जागेला अकृषक दाखला (एन.ए.) न मिळाल्याने कर्ज मिळत नाही. त्यामुळे सावकाराच्या दारात जाण्याशिवाय जनतेस पर्याय उरलेला नाही. सत्ताधाऱ्यांमुळेच हे सावकार सोन्याने पिवळे झाले आहे. खोत म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाचे भीती घालून जमिनी बळकावण्याचा गोरख धंदा केला. विकास आघाडीची सत्ता आल्यावर अन्यायी आरक्षणे रद्द करणार, खुल्या जागा नागरिकांच्या सहमतीने विकसित करणार. यावेळी निशिकांत पाटील, विजय पवार, महेश खराडे, भागवत जाधव उपस्थित होते. (वार्ताहर) भिंत पाडून : पाय बाहेर! ४खोत म्हणाले, अंथरुण पाहून पाय पसरावेत, असा व्यावहारिक जीवनातील सामाजिक संकेत आहे. मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नुसते अंथरुणच नव्हे, तर भिंती पाडून आपले पाय बाहेर काढले. त्यामुळे शहराची अशी अवस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला. ४निशिकांत पाटील म्हणाले, आम्ही कोणाला हरवण्यासाठी ही निवडणूक लढवत नाही. शहराच्या विकासाचा कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. कोणी २४-२५ म्हणत असेल, मात्र आम्ही २९-० च करणार.