शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

वैभव नायकवडींना भाजपमध्ये निमंत्रण

By admin | Updated: November 26, 2015 00:17 IST

चंद्रकांतदादांकडून पायघड्या : चांगले काम करणाऱ्यांनी सोबत येण्याचे आवाहन

वाळवा : चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही व आमचे सरकार आहे. पण चुकीचे काम करणाऱ्यांना ते आमचे असले तरी, पाठीशी घालणार नाही. तुमचे काम चांगले आहे. तेव्हा तुम्ही भाजपबरोबर यावे, अशी अपेक्षा सहकार, पणन, वस्त्रोद्योग व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी वैभव नायकवडी यांच्याकडे व्यक्त केली.निमित्त होते क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने वाळवा येथे क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी क्रीडानगरीत आयोजित शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनाचे.यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते स्थापनेपासून हुतात्माला उच्चांकी साखर उताऱ्याबद्दल मिळालेले २६ पुरस्कार, गतवर्षी उसाला उच्चांकी २६३९ रुपये दर दिल्याबद्दल हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांचा सत्कार करण्यात आला.हुतात्मा पॅटर्नचा गौरव करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कमी खर्चात साखर कारखाना उभारून कमी मनुष्यबळ, व्यवस्थापनात काटकसर करून केवळ साखर या एकमेव उत्पादनावर ‘हुतात्मा’ला एफआरपीप्रमाणे एकरकमी दर देणे परवडते, मग इतरांना ते का जमत नाही, याबाबतही विचार होण्याची गरज आहे. स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार होते, परंतु ते उपस्थित राहू शकले नाहीत, याबाबत स्पष्टीकरण देताना पाटील यांनी, भिवंडी येथे महत्त्वाचे काम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास येऊ शकले नाहीत, अशी माहिती दिली. आगामी दोन महिन्यात कोणतेही चांगले काम काढा, मी आवर्जून येतो, असा निरोप त्यांनी दिला आहे. तेव्हा ‘मुख्यमंत्र्यांच्या कानात कुणीतरी काहीतरी सांगितले असेल, म्हणून ते आले नाहीत, असा गैरसमज करून कोणी घेऊ नये, अशी मिष्किल टिपणीही त्यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता केली. (वार्ताहर)‘हुतात्मा’ची मदतहुतात्मा साखर कारखान्याच्यावतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीस १२ लाख ४७ हजार ३७९ रुपयांची मदत देण्यात आली. रकमेचा धनादेश कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, उपाध्यक्षा वंदना माने यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.