शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेच्या २१९ शाखांची ४८ अधिकाऱ्यांकडून चौकशी, अनेक घोटाळे उजेडात येण्याची शक्यता

By अशोक डोंबाळे | Updated: May 24, 2024 18:32 IST

शाखांच्या सर्व व्यवहारांची तपासणी

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील जिल्ह्यातील २१९ शाखांत अशाप्रकारे अपहार झाला आहे का? याबाबतची तपासणी करण्यासाठी सहा पथके तयार केली आहेत. अधिकारी आणि कर्मचारी अशा ४८ जणांकडून काल, गुरुवारपासून जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये चौकशी सुरू केली आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान, विमा रक्कम देण्यात येते. ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात पाठवली जाते. यातील अनेक खात्यांवरील रक्कम काढली जात नाही. अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची रक्कम तशीच पडून आहे. या रकमेचा अपहार करून ती काढण्यात आल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आला. त्याशिवाय त्यानंतर निमणी सिद्धेवाडी येथेही असे प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संचालक मंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली.तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय अशा पद्धतीने अपहार इतरत्र झाला आहे का याची तपासणी करण्यासाठी ४८ अधिकारी, कर्मचारी यांची सहा पथके तयार करण्यात आली. ही पथके गुरुवारपासून चार दिवस विविध शाखांत भेटी देऊन तपासणी करणार आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवारी सार्वजनिक सुट्टीचा दिवस असूनही जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी हे कामावर हजर होते. त्यांनी अनुदान आलेल्या खात्याची तपासणी सुरू केली आहे. पुढील चार दिवस ही तपासणी सुरू राहणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून शाखांना भेटीसर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी हे अपहार प्रकरणाची तपासणी करण्यासाठी कामावर हजर होते. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी जिल्ह्यातील बँकेच्या विविध शाखांना भेटीत देत आहेत. बुधवारी त्यांनी कवलापूर, तासगाव, कवठेएकंद येथील शाखेला भेट दिली. त्याशिवाय गुरुवारी त्यांनी जत, कुंभारी येथील शाखांना भेट देऊन पाहणी केली. शुक्रवारीही त्यांनी जिल्ह्यातील अनेक शाखांना अचानक भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

घोटाळ्यातील काही कर्मचारी रजेवरजिल्हा बँकेच्या विविध शाखांमधील घोटाळे उघडकीस येऊ लागले आहेत. त्यामुळे घोटाळ्याशी संबंधित काही कर्मचारी बुधवारपासूनच रजेवर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या रजेचीही जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक