शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

शुभम गुप्ता यांच्या सांगलीतील कारभाराची चौकशी करा - संजय पाटील 

By घनशाम नवाथे | Updated: June 13, 2025 16:19 IST

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार

घनशाम नवाथे सांगली : महापालिकेतील उपायुक्त वैभव साबळेला अटक केल्यानंतर तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कारनाम्यांची माहिती बाहेर येत आहे. त्यांनी येथील पदभार घेतल्यानंतरच्या सर्व कारभाराची, अर्थव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार असल्याची माहिती माजी खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, तत्कालीन आयुक्त गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मर्यादा सोडून काही गोष्टी केल्या आहेत, त्या धक्कादायक आहेत. कोणतेही काम पैसे घेल्याशिवाय होत नसल्याच्या नागरिक आणि विविध उद्योगात काम करणाऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. आयुक्त गुप्ता यांचा कारभार हा अतिशय भ्रष्टाचाराने बरबटलेला राहिला आहे. त्यांनी जिल्हा बँकेसह इतर संस्थानादेखील सोडले नाही.गुप्ता यांच्या व्हॉट्सॲप कॉलची चौकशी करावी. त्यामधून भ्रष्टाचार समोर येईल. फाइल का थांबत होत्या, अडवणूक का होत होती, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आदींना त्रास झाला. त्यांनी अनेकांचे शोषण करण्याचा प्रकार केला. परंतु तो खपवून घेणार नाही. त्यामुळेच गुप्ता यांची चौकशी करण्याची मागणी करत आहे.

..त्यावेळी विशाल पाटील यांनी केली होती पाठराखण पाटील पुढे म्हणाले, शासनाच्या आदिवासी विकास विभागाने आयुक्त गुप्ता यांची चौकशी करून त्यांच्यावर ठपका ठेवला होता. अशा अधिकाऱ्यांवर वचक बसवून प्रशासकीय यंत्रणेला आदर्श घालून देणे गरजेचे आहे. आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराचे आरोप आयुक्त गुप्ता त्यांच्यावर होताना खासदार विशाल पाटील यांनी पाठराखण केली होती.मात्र अशा कारभाराला त्यांचे समर्थन असेल असे वाटत नाही. लोकप्रतिनिधींचा वचक असणाऱ्या जिल्हा बँकेला बांधकाम परवानगीसाठी लाखो रुपये लाच द्यावी लागते हे दुर्दैव आहे. वैभव साबळे हा छोटा मासा असून, मोठा मासा गळाला लागला पाहिजे.

शेती नुकसानीचे पंचनामे कराजिल्ह्यात पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला उत्पादक आणि जिरायत शेतीचे नुकसान झाले आहे. ओढ्यातून काही जनावरे वाहून गेले आहेत. नुकसानग्रस्त शेतीचे शासनाने पंचनामे करून भरीव मदत करावी, अशी मागणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.