शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

इस्लामपूरच्या रस्त्यावरून पवार बंधूंचा उलटा प्रवास

By admin | Updated: July 21, 2016 00:49 IST

नगरपालिका : शहरातील निकृष्ट दर्जाची कामे बंद पाडून नेमके साधले काय?

अशोक पाटील--इस्लामपूर --पावसाळ्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने शहरातील विविध रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण केले आहे. या कामावर चार कोटी खर्च करण्यात आले आहेत. ही निकृष्ट कामे बंद पाडण्यात माजी नगरसेवक वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार आघाडीवर होते, तरीही निकृष्ट कामे कशी झाली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांनी दोन कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पवार बंधूंनी केला आहे. या सर्व प्रकारावरुन पवार बंधूंनी नेमके काय साध्य केले, असेही विचारले जात आहे.आघाडी शासनाच्या कालावधित इस्लामपूर पालिकेत तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी कोट्यवधीचे अनुदान आणले. त्यातून झालेल्या विकास कामांचा गाजावाजाही करण्यात आला. परंतु पालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी विकास कामांचे तीनतेरा वाजले. आता त्यावेळच्या घोषणाही बासनात गुंडाळल्या गेल्या आहेत. भुयारी गटार, भव्य-दिव्य रस्ते, सुशोभित चौक हे दिवास्वप्नच ठरले आहे.सत्ताधाऱ्यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची कामे करून घेतली. परंतु पहिल्याच पावसात या कामांचा दर्जा दिसून आला. ही कामे सुरू असताना पवार बंधूंनी स्वत: लक्ष घातले होते, तरीही रस्त्याचा दर्जा का सुधारला नाही, असा प्रश्न आता सर्वसामान्य करू लागले आहेत.शहरातील रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वीच याचा ठेका कोणाला दिला आहे, हे सर्वांना ज्ञात होते. परंतु विजय पवार यांना आता साक्षात्कार का झाला आहे? युनिटी बिल्डर्सचे यतीन सावंत यांचे दत्ता देसाई मेहुणे आहेत, तर मेघा बिल्डर्सचे आकाश सावंत हे यतीन सावंत यांचे सख्खे चुलतबंधू आहेत. एकाच घरातील या तीन ठेकेदारांनी निविदा भरली होती. यातील कमी दराची युनिटी बिल्डर्सची निविदा पालिकेने जादा दराने मंजूर केली. या प्रक्रियेची माहिती पवार आणि विरोधकांना आधी नव्हती का, असाही सवाल विचारला जात आहे.आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांत ताळमेळ नसला तरी, पवार बंधूंनी मात्र निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामावर आवाज उठवून लक्ष वेधून घेतले आहे. परंतु त्यांच्या पाठीशी विरोधकांची ताकद नसल्याने त्यांची सत्ताधाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. पवार बंधूंना खरोखरच रस्त्यांची चांगली कामे करायची होती, तर निकृष्ट कामे कायमची बंद का पाडली नाहीत? आता त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणे म्हणजे, ‘बैल गेला आणि झोपा केला’ या म्हणीसारखे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.दर्जेदार रस्ते तयार व्हावेत म्हणून आम्ही नेहमीच आक्रमक होतो. त्यामुळे काही ठिकाणचे रस्ते दर्जेदार झाले आहेत. जेथे आमची उपस्थिती नव्हती, तेथील रस्ते पहिल्याच पावसात खराब झाले आहेत. त्याविरोधात आम्ही कायदेशीर लढाई सुरू केली आहे. या लढाईत आम्हाला न्याय मिळेल यात शंका नाही.- विजय पवार, अध्यक्ष युवक काँग्रेस, वाळवारस्त्यांच्या कामावर झालेल्या खर्चाबाबत सविस्तर माहिती घेऊनच आरोप करावेत. विरोधकांनी काहीही बोलू नये. रस्ते चांगले व्हावेत म्हणून पवार बंधूच कामात अडथळा आणत होते. नंतर मात्र ठेकेदाराची एकांतात गाठभेट झाल्यानंतर रस्त्याची कामे सुरू होत होती. आमच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आहेत.- सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्ष