शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कवठेएकंदच्या शाळांना आंतरराष्ट्रीय मान्यता, जिल्हा परिषदेच्या शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 13:58 IST

कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी निवड झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही निवड झाल्याचे पत्र देण्यात आले आहे.

ठळक मुद्देकवठेएकंदच्या शाळांना आंतरराष्ट्रीय मान्यता, जिल्हा परिषदेच्या शाळाशैक्षणिक गुणवत्ता आणि लोकसहभागातून मिळाले मोठे यश

प्रदीप पोतदार कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी निवड झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही निवड झाल्याचे पत्र देण्यात आले आहे.विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, सातत्यपूर्ण पटसंख्या, कौशल्यपूर्ण अध्यापक वर्ग, शैक्षणिक कार्यात लोकांचा उत्स्फूर्त सहभाग, शैक्षणिक उठावातून भरीव कामगिरी यामुळेच जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा क्र. १ व जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा क्र. २ या शाळांना आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी मान्यता प्राप्त झाली आहे.महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीकडून गेल्या वर्षभरात विविध निकषांवर वेगवेगळ्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कवठेएकंद जिल्हा परिषद शाळांचे सादरीकरण चांगल्याप्रकारे झाले होते. जिल्ह्यातील चार शाळा पात्र ठरल्या होत्या. नुकतीच महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पाहणी पथकाने भेट देऊन स्थानिक पातळीवरील अनेक घटकांची पाहणी केली.

विद्यार्थी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्याशी संवाद साधून मुलाखती घेतल्या. दरम्यान, येथील भौगोलिक स्थिती, भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी संख्या, लोकसहभाग, दळणवळण याबाबतीत मूल्यमापन केले. याअनुषंगाने २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयइबी) अस्थायी संलग्नता मिळाली असून, पूर्व प्राथमिक ते चौथीची मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक शिक्षकांना प्रशिक्षण व माहिती देण्यात येणार आहे.लोकसहभागातून इमारतसर्व शिक्षा अभियानांतर्गत कवठे एकंद येथे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा इमारत उभारण्यात आली आहे. सुमारे २९ लाख रुपये शासकीय अनुदानाबरोबर सुमारे ३४ लाख रुपयांची लोकवर्गणी संकलित करून गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटविला.या आहेत सुविधा...तीनमजली टोलेजंग इमारत गावच्या शैक्षणिक सुविधेसाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हरांडा व सुरक्षितरित्या ग्रील, ग्रॅनाईट फरशी, आकर्षक रंगरंगोटी यामुळे देखणे स्वरूप इमारतीस प्राप्त झाले आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल वर्ग, संरक्षक भिंत, सुलभ शौचालय, बाथरूमसह स्वच्छ पाणी पुरवठा सोय अशी कामे प्रस्तावित आहेत.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाSangliसांगली