शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील गोटखिंडीत ऐक्याची परंपरा.. मशिदीत गणेशाची प्रतिष्ठापना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 19:09 IST

४४ वर्षांची परंपरा 

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुझार चौकात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मशिदीमध्ये न्यू गणेश मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आष्टा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित आवटे, निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहायक निरीक्षक संतोष यादव, दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठापना करण्यात आली.मशिदीमध्ये गणपती प्रतिष्ठापनेचे ४४ वे वर्ष आहे. यावेळी मुस्लीमहिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. १९८० साली येथील झुंझार चौकातील मोकळ्या जागेमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना होत होती. त्यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गणपती कोठे स्थापन करावयाचा? असा प्रश्न उपस्थित झाल्याने हिंदू, मुस्लीम बांधवानी एकत्रित मशिदीमध्येच न्यू गणेश मंडळाच्या गणपतीची स्थापना करण्याचे ठरवले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी गणपतीची प्रतिष्ठापना मशिदीमध्ये करण्याची परंपरा कायम आहे. मुस्लीम बांधव दररोज एकत्रित येऊन गणपतीची आरती करतात. मशिदीत साजरा होणारा येथील गणेशोत्सव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे व सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरला आहे.या मंडळाने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासारखे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गोटखिंडी येथील सर्वात मोठे मंडळ व हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक अशी या मंडळाची ओळख आहे.यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके, सचिव राहुल कोकाटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात, ॲड. अर्जुन कोकाटे, ठिबक सिंचनचे प्रवर्तक विनायक पाटील, जालिंधर थोरात, सचिन शेजावळे, रियाज मुलानी, प्रशांत थोरात, रोहन थोरात, हनुमंत जाधव, सोन्या जिनगर, सनी थोरात, आदित्य महाजन, सचिन पेटकर, पिंटू महाजन, संदीप शिंगटे, इलाई पठाण, प्रमोद स्वामी यांच्यासह हिंदू-मुस्लीम बांधव उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024HinduहिंदूMuslimमुस्लीम