शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मांदियाळी

By admin | Updated: March 18, 2016 23:31 IST

तासगाव नगरपालिका : आठ महिन्यांचा कालावधी; निर्णयाचा चेंडू खासदारांच्या कोर्टात

दत्ता पाटील -- तासगाव  तासगाव नगरपालिकेतील नगराध्यक्ष बदलासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सद्यस्थितीत नगराध्यक्ष पदाचा कालावधी आठ महिन्यांचा राहिला आहे. त्यातील एक महिना आचारसंहितेत जाणार आहे. त्यामुळे उर्वरित कालावधित नगराध्यक्ष पदाची संधी मिळविण्यासाठी इच्छुकांची मांदियाळी तयार झाल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकीपूर्वी माजी नगराध्यक्षाची बिरुदावली लावण्याचे अनेकांचे मनसुबे असले तरी, निर्णयाचा चेंडू खासदार संजयकाका पाटील यांच्या कोर्टात आहे. नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या सुशिला साळुंखे यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यांचा दोन महिन्याचा कार्यकाल पूर्ण झाला, त्यादिवशीच सुशिला साळुंखेंनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बाबासाहेब पाटील यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. तत्पूर्वी नगराध्यक्ष पदावरुन जोरदार लॉबिंंग झाले होते. नगराध्यक्ष पाटील यांचा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. त्यांनी खासदार संजयकाकांचा आदेश आल्याशिवाय राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगत भूमिका स्पष्ट केली. नगराध्यक्ष पाटील खुर्चीवर कायम राहण्याची चिन्हे दिसताच, इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली. गेल्या आठ दिवसांपासून नगरसेकांच्या याबाबत जोरदार हालचाली सुरु आहेत. नगराध्यक्ष बदलाच्या बाजूने पारडे जड करण्यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी, यासाठी इच्छुकांची धडपड सुरु असून यावेळी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नगरसेवक अविनाश पाटील, अनिल कुत्ते, शरद मानकर, जाफर मुजावर, रजनीगंधा लंगडे, राजू म्हेत्रे यांची नावे चर्चेत आहेत. इच्छुक असणाऱ्या काही नगरसेवकांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे, तर काहींनी खासदार संजयकाकांनी आदेश दिला, तर नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. एकंदरीत नगराध्यक्षांच्या उचलबांगडीसाठी नगरसेवकांच्या पडद्याआड मोठ्या हालचाली सुरु असून शनिवारी खासदार संजयकाका पाटील यांची भेट घेऊन, नव्या नगराध्यक्ष निवडीची मागणी करण्यात येणार आहे.पक्षप्रतोदांकडे जबाबदारी नगराध्यक्ष बदल व्हावा, अशी मागणी करणाऱ्या नगरसेवकांत वाढ झाली आहे. यापूर्वी विद्यमान नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांना संधी मिळावी, यासाठी पुढाकार घेणाऱ्या काही नगरसेवकांनीदेखील आता नगराध्यक्ष बदलाची बाजू घेतली आहे. नगराध्यक्ष बदल व्हावा, या मागणीसाठी आठ नगरसेवकांची गोपनीय बैठक झाल्याची चर्चा असून या बैठकीत पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांच्याकडे नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या बैठकीतच शनिवारी खासदार संजयकाकांची भेट घेण्याचा निर्णय झाला आहे. विद्यमान नगराध्यक्षांना नेमकी किती कालावधीसाठी संधी दिली आहे, याबाबत नगरसेवकांना माहिती नाही. नगराध्यक्ष बदल करुन इतर नगरसेवकांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी, अशी काही नगरसेवकांची इच्छा आहे. याबाबत खासदार संजयकाका पाटील यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी आठ नगरसेवकांनी केली आहे. त्यानुसार शनिवारी मी संजयकाकांची भेट घेऊन नगरसेवकांचे मत सांगणार आहे.- अनिल कुत्ते, पक्षप्रतोद.