शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

Sangli: शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी समितीकडून खानापूरच्या जागेची पाहणी

By शरद जाधव | Published: January 09, 2024 5:34 PM

विटा/खानापूर : शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर येथे होणाऱ्या उपकेंद्राच्या जागेची पहाणी मंगळवारी उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीने केली. यावेळी समितीने खानापूर येथे प्रत्यक्ष ...

विटा/खानापूर : शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर येथे होणाऱ्या उपकेंद्राच्या जागेची पहाणी मंगळवारी उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीने केली. यावेळी समितीने खानापूर येथे प्रत्यक्ष जाऊन उपलब्ध राष्ट्रीय महामार्गालगतची जागा, पाण्याची व्यवस्था, दळणवळण सुविधा यासह विविध गोषींचा विचार करून ही जागा उपकेंद्रासाठी योग्य असल्याचे मत नमूद केले. यावेळी अभिसभा सदस्य माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व सौ. मेघाताई गुळवणी यांनी खानापूर येथे टेंभू योजनेच्या जुन्या बंद असलेल्या इमारतीत जूनपासून विद्यापीठ उपकेंद्राचे काम तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावे, अशी मागणी केली.खानापूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र होण्याबाबत अधिसभा सदस्यांच्या बैठकीत प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीचे सदस्य आज, सकाळी खानापूरात दाखल झाले. त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुहास शिंदे यांच्यासह शिवसेनेचे दादा भगत यांनी समितीचे स्वागत केले. त्यानंतर समितीने उपलब्ध असलेल्या तेथील जागेची पहाणी केली. पाण्याची व्यवस्था, दळणवळण, महामार्गालगतची जागा याची पहाणी करून ही जागा उपकेंद्रसाठी योग्य असल्याचे सांगितले.

त्यानुसार समितीचा अहवाल विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर दि. १५ जानेवारीपर्यंत ठेऊन त्याची मान्यता घेऊन सिनेट, उपकेंद्र समितर व्यवस्थापन परिषदेचा एकत्रित अहवाल राज्य शासनाकडे सादर करून उपकेंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही होणार असल्याची माहिती सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव पाटील यांनी दिली.दरम्यान, खानापूरच्या टेंभू कार्यालयातील वापरात नसलेल्या इमारतीची पहाणीही यावेळी समितीने केली.उपकेंद्र सुरू करताना सुरूवातीच्या काळात तेथील इमारत वापरणे संबंधीचा प्रस्ताव शासनास देऊन येत्या जूनपासून हे उपकेंद्र खानापूर येथे सुरू करण्यासाठी समिती प्रयत्नशील राहील, अशी माहिती शिवाजी विद्यापीठा अभिसभा सदस्य अ‍ॅड. वैभव पाटील यांनी दिली. या समितीत प्राचार्या डॉ. मेघाताई गुळवणी, डॉ. रघुनाथ डमकले, अ‍ॅड. स्वागत परूळेकर, अ‍ॅड. वैभव पाटील, श्रीमती काव्याश्री नलवडे, संजय परमणे, विशाल गायकवाड, डॉ. प्रशांत खरात सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीShivaji Universityशिवाजी विद्यापीठ