शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

‘व्यंकटेश्वरा, रेणुका, उगार’कडून चौकशी

By admin | Updated: April 22, 2017 00:31 IST

वसंतदादा कारखाना निविदा प्रक्रिया : शुक्रवारी दिवसभरात अर्जाची विक्री नाही

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वाने देण्यासाठी निविदा अर्ज विक्री व दाखल करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. दिवसभरात व्यंकटेश्वरा, रेणुका शुगर व उगार शुगर या तीन कारखान्यांनी जिल्हा बँकेकडे चौकशी केली. निविदा दाखल करण्याची मुदत ३ मेपर्यंत आहे. थकीत ९३ कोटी रुपयांच्या कर्जापोटी सांगली जिल्हा बँकेने वसंतदादा कारखान्याचा ताबा घेतला आहे. याच कर्जाच्या वसुलीसाठी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कारखान्याचा भाडेकरार किती वर्षांसाठी असावा, याचा निर्णय निविदाधारकांवर सोपविला आहे. कमीत-कमी कालावधित जास्तीत-जास्त भाडे देणाऱ्या संस्थेला प्राधान्याने कारखाना देण्याचे धोरण यामागे असण्याची चिन्हे आहेत. प्राप्त निविदा कोणतेही कारण न देता स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा अधिकार बँकेने स्वत:कडे राखून ठेवला आहे. वसंतदादा कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ७ हजार ५०० टन आहे. कारखान्यासह डिस्टिलरी, यंत्रसामग्री, वापरातील इमारती, गोदामे व अन्य मालमत्ताही भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया ८ मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे मे महिन्यात हा कारखाना नव्या संस्थेकडे जाणार आहे.निविदा अर्जांच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरूवात झाली. वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वाने चालविण्यासाठी सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कारखाने इच्छुक आहेत. शुक्रवारी दिवसभरात व्यंकटेश्वरा, रेणुका शुगर व उगार शुगर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने जिल्हा बँकेशी संपर्क साधून माहिती घेतली. या तीन कारखान्यांसह राजारामबापू व अथणी शुगर या दोन कारखान्यांच्या निर्णयाकडेही सभासदांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)