शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पालिकेतील गैरकारभाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 12:14 IST

तासगाव नगरपालिकेत सत्तेतील गोल्डन गँगकडून अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनेक बोगस कामे झाली आहेत. लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

ठळक मुद्देतासगाव पालिकेतील गैरकारभाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी -संजयकाका पाटील : भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही

 

तासगाव : तासगाव नगरपालिकेत सत्तेतील गोल्डन गँगकडून अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनेक बोगस कामे झाली आहेत. लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याबाबत ‘लोकमत’मधून ‘कारभाऱ्यांचा विकास, तासगाव भकास’ अशी मालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्याची दखल घेत खासदार संजयकाका पाटील यांनी पालिकेतील गैरकारभाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यधिकारी गणेश शिंदे यांना दिले आहेत. तसेच भ्रष्ट कारभार करणाऱ्यां  अधिकारी आणि कारभाऱ्यांना पाठीशी घालणार नसल्याचे खासदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले.

तासगाव पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी काही महिन्यांपासून बोगस ठराव करून, लाखो रूपयांचा निधी हडप करण्याचे कारनामे सुरु केले आहेत. याबाबत ‘लोकमत’मधून सत्ताधाऱ्यांच्या बेलगाम कारभाराबाबत विशेष मालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. या मालिकेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेला भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला होता.

या मालिकेची दखल घेत खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पाटील म्हणाले, जनतेने मोठ्या विश्वासाने पालिकेची सत्ता भाजपकडे दिली आहे. जनतेच्या विश्वासाशी बांधील राहत,      शहराच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. 

हा निधी आणण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च झाला पाहिजे. या निधीवर अन्य कोणी डल्ला मारत असेल, तर ते अजिबात सहन केले जाणार नाही. पालिकेच्या कारभाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी  करण्याचे आदेश मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना दिले आहेत. काही नगरसेवकांकडून माझ्या नावाचा वापर करून बेकायदा काम करण्याचे  उद्योग सुरू आहेत. हे अजिबात सहन करणार नाही.

माझ्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांना लवकरच त्यांची जागा दाखवून देऊ. चौकशीत कोणीही दोषी आढळला तरी, कोणालाही पाठीशी घालणार नाही. काही अधिकाऱ्यांकडून जाता-जाता हात मारण्याचे उद्योग झाले आहेत. त्याचीही सखोल चौकशी करून  दोषी आढळल्यास कठोर कारवाई होईल, असेही खासदार पाटील यांनी स्पष्ट केले.स्वच्छतेचा ठेका बोगस असेल तर रद्

शहर स्वच्छतेचा ठेका बोगस कागदपत्रे जोडून घेण्यात आला आहे.  गोल्डन गँगकडून नागरिक आणि नगरसेवकांच्या तक्रारी असूनदेखील ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे. याबाबत संजयकाका म्हणाले, ठेक्याबाबतच्या काही तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. माझ्या नावाचा गैरवापर करून कोणी ठेकेदाराला अभय देत असेल, तर गय केली जाणार नाही. बोगसगिरी असेल तर ठेका रद्द होईल, असेही खासदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली