शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या आयुक्तांवरील आक्षेपांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:45 IST

सांगली : महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर हे भाजपधार्जिणे असून, त्यांच्या अधिपत्याखाली निवडणुका झाल्यास पक्षपातीपणा होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार महापौर हारूण शिकलगार यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालानंतर आयोगाकडून आयुक्तांबद्दलचा फैसला घेतला जाणार असल्याचे समजते.महापौर ...

सांगली : महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर हे भाजपधार्जिणे असून, त्यांच्या अधिपत्याखाली निवडणुका झाल्यास पक्षपातीपणा होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार महापौर हारूण शिकलगार यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालानंतर आयोगाकडून आयुक्तांबद्दलचा फैसला घेतला जाणार असल्याचे समजते.महापौर शिकलगार यांनी दोन आठवड्यांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्यात महापालिकेच्या आयुक्तांनी निवडणूक आयोगाचा १९६९ चा आदेश दाखवून निवडणुकीच्या पूर्वीच तीन महिने अगोदरच विकासकामे प्रलंबित ठेवण्याचे आदेश मनपाच्या खातेप्रमुखांना दिले आहेत. मात्र, हे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहीत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात नगरसेवकांची कामे ठप्प झाली आहेत. तसेच मंत्री, राज्यमंत्री, आमदार व खासदारांना काम करण्यास मुभा मिळत आहे. हा आयुक्तांनी पक्षपातीपणा केला आहे. पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्हाभर लागू होती. त्यानुसार महापालिकेच्या पदाधिकाºयांची वाहने व सीमकार्ड प्रशासनाने काढून घेतली. फलक देखील काढले. निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा झाली, तरीदेखील पदाधिकाºयांना वाहने दिली नाहीत. राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सांगलीत येणार असल्याचे कळताच आयुक्तांनी पदाधिकाºयांना घाईगडबडीने रात्रीत वाहने परत केली. तसेच कार्यालयावर फलक लावले. त्यांचा हा ढोंगीपणा आहे. त्यांनी अधिकाºयांना व्हॉट्स अ‍ॅपवरून पाठविलेल्या संदेशांची सत्यता पडताळावी. आयुक्तांनी अनेक कामे अधिकाराचा गैरवापर करून केली आहेत. त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे या निवडणुका आयुक्तांच्या अधिपत्याखाली घेऊ नयेत, अशी मागणी केली होती.महापौरांच्या या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. आयोगाने जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांना, याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी महापौरांसह काही अधिकाºयांची भेट घेऊन आयुक्तांबद्दलच्या आक्षेपांची माहिती घेतल्याचे समजते. आयुक्तांबद्दलचा अहवाल जिल्हाधिकाºयांनी तयार केला असून लवकरच तो आयोगाकडे पाठविला जाणार आहे. या अहवालानंतर निवडणुका आयुक्तांच्या अधिपत्याखाली घ्यायच्या की नाही, याचा फैसला होणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या अहवालाकडे सत्ताधारी काँग्रेसचे लक्ष लागले आहे.चौकशीची कबुलीजिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार माझ्याविरोधातील आक्षेपांबाबत माहिती घेतली आहे. त्यांना खुलासेवार माहिती दिली असल्याचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सांगितले. तसेच महापौर शिकलगार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही चौकशीला दुजोरा दिला. आयुक्तांबद्दलच्या आक्षेपांबाबत अधिकाºयांनी माझ्याकडे चौकशी केली. त्यांना त्यांच्या कारभाराबद्दलची सर्व माहिती दिली आहे. ते पक्षपातीपणे वागतात, यावर मी आजही ठाम आहे. आता जिल्हाधिकाºयांकडून काय अहवाल जातो, याकडे आमचे लक्ष आहे.