शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

माहिती उपसंचालक अनिरूध्द अष्टपुत्रे यांचे सांगलीत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:09 IST

कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालकपदी अनिरूध्द अष्टपुत्रे रूजू झाले असून त्यांनी आज जिल्हा माहिती कार्यालय, सांगली कार्यालयास भेट दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी संप्रदा बीडकर व कर्मचारी उपस्थित होते.

ठळक मुद्देमाहिती उपसंचालक अनिरूध्द अष्टपुत्रे यांचे सांगलीत स्वागतसांगली जिल्हा माहिती कार्यालयास भेट

सांगली : कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालकपदी अनिरूध्द अष्टपुत्रे रूजू झाले असून त्यांनी आज जिल्हा माहिती कार्यालय, सांगली कार्यालयास भेट दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी संप्रदा बीडकर व कर्मचारी उपस्थित होते.माहिती उपसंचालक अनिरूध्द अष्टपुत्रे जिल्हा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग या पदावर कार्यरत होते. तेथून पदोन्नतीने त्यांची कोल्हापूर माहिती उपसंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी ठाणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले असून, कोकण विभागाचे प्रभारी उपसंचालक म्हणूनही काही काळ काम केले आहे. तसेच, त्यांनी 20 वर्षे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक व वरिष्ठ सहायक संचालक म्हणून काम पाहिले.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयात जबाबदारी सांभाळली आहे. मंत्रालयात वृत्त शाखेत कार्य अधिकारी, दृक श्राव्य विभाग, अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशने शाखा, महान्यूज पोर्टल यांचे कामही त्यांनी सांभाळले आहे.महासंचालनालयाकडील सुमारे 5 हजार दुर्मिळ आणि खुप जुन्या चित्रपट, वृत्तचित्र आणि माहितीपटांच्या डिजिटलायझेशनचे काम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. कोकण विभागाच्या उपसंचालक पदाचा कार्यभारत असताना त्यांनी किल्ले रायगडची सचित्र माहिती असणाऱ्या कॉफी टेबल बुकची निर्मिती केली होती. ठाणे येथे उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांना गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

टॅग्स :Information & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालयSangliसांगली