शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

इंदुताई पाटणकर यांचे कार्य युवा पिढीला आदर्शवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:35 IST

कासेगाव : क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर यांचे कार्य युवा पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यांनी आयुष्यभर गोरगरीब, अनाथ, परित्यक्ता महिलांसाठी केलेले काम ...

कासेगाव : क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर यांचे कार्य युवा पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यांनी आयुष्यभर गोरगरीब, अनाथ, परित्यक्ता महिलांसाठी केलेले काम अतुलनीय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी केले.कासेगाव (ता. वाळवा) येथे क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वाहरू सोनावणे, ठगीबाई वसावे, डॉ. भारत पाटणकर व डॉ. गेल आॅम्वेट यांची प्रमुख उपस्थिती होती.बाबा आढाव म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या कार्यकाळाचा विचार करता, इंदुताई पाटणकर यांचे सामाजिक चळवळीत मोठे योगदान आहे. त्यांनी महिलांच्या हक्कासाठी व न्यायासाठी अनेक आंदोलने केली. त्यांचे सुपुत्र डॉ. भारत पाटणकर हे तार्इंचे अपुरे कार्य मोठ्या हिमतीने पुढे नेत आहेत.यावेळी यावर्षीचा ‘क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर स्मृती पुरस्कार’ नंदुरबार येथील स्त्री-मुक्ती चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या ठगीबाई वसावे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनी इंदुताई यांच्यावर लिहिलेल्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, हा चरित्रग्रंथ मी लिहिला नसून, माझ्या आईनेच ते तिच्या डायरीमध्ये वेळोवेळी लिहून ठेवले होते. ते मी या पुस्तकातून फक्त मांडण्याचा प्रयत्न केला आहे.ठगीबाई वसावे म्हणाल्या की, हा पुरस्कार मिळणे म्हणजे मोठी जबाबदारी असून, येथून पुढेही मी सामाजिक कामात अग्रेसर राहीन.यावेळी अ‍ॅड. बी. डी. पाटील, रवींद्र बर्डे, शंकरराव भोसले, सचिन पाटील, अ‍ॅड. संदीप पाटील, अधिक मिसाळ, क्रांतिकुमार मिसाळ, विजय भिंगारदेवे आदी उपस्थित होते.जयंत निकम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. योगेश पाठसुते यांनी सूत्रसंचालन केले.