अविनाश कोळी सांगली : कुपवाड एमआयडीसीतील उद्योगांची धडधड आता वेगाने सुरू झाली असली तरी, मालवाहतुकीचे घोडे अडल्याने उद्योजकांसमोर नवे संकट उभारले आहे. परराज्यातील कच्च्या मालाची आवक व उत्पादित मालाची परराज्यातील वाहतूक अजूनही बंद असल्याने उद्योजकांसमोर पेच निर्माण झाला आहे.कुपवाड एमआयडीसीमधील ५०० म्हणजेच ६० टक्क्यांहून अधिक उद्योग सुरू झाले. या एमआयडीसीत आॅटोमोबाईल उद्योगांसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचे कारखाने, फौंड्री (धातू वितळविणारे कारखाने), यंत्रमाग, फूड इंडस्ट्री, सिमेंट आर्टिकल्स असे उद्योग आहेत. कच्चा माल राजस्थान, पंजाब, कोलकाता, सूरत, लुधियाना, रायपूर, चेन्नई, मुंबई येथून येतो. मुंबई व पुण्यातील लॉकडाउनचा परिणाम सांगलीच्या उद्योगावर होत आहे.
सांगलीत उद्योग सुरू झाले, वाहतुकीचे घोडे अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 04:55 IST