शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘इंद्रजित’चा ऐरावत ‘कृष्णा’च्या डोहात

By admin | Updated: July 7, 2015 23:37 IST

संस्थापक पॅनेलमध्ये अजूनही धुगधुगी : पराभवानंतर ‘रयत’वर आत्मपरीक्षणाची वेळ

अशोक पाटील - इस्लामपूर -कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांच्याविरोधात रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी जोरात तयारी केली होती, परंतु अचानक सक्रिय झालेले मदन मोहिते यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ‘इंद्रजित’चा ऐरावत कृष्णाच्या डोहात साफ बुडाला. दुसरीकडे सहकार पॅनेलने मुसंडी मारून संस्थापक पॅनेलला गारद केले असले तरी, स्वत: अविनाश मोहिते आणि त्यांचे पाच संचालक निवडून आल्याने या पॅनेलमध्ये अजूनही धुगधुगी आहे. कृष्णा कारखान्याची निवडणूक लागण्यापूर्वीच डॉ. इंद्रजित मोहिते यांनी रयत पॅनेलच्या माध्यमातून वातावरण निर्माण केले होते. वर्षभरापासून त्यांनी सभासदांशी संपर्क ठेवून आपले म्हणणे पटवून देण्यास सुरुवात केली होती. त्यांचे बंधू मदन मोहिते यांनी स्वत:ची ताकद अजमावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला स्वतंत्र पॅनेल उभे करून निवडणूक लढविण्याबाबत प्रयत्न केले. परंतु अंतिम टप्प्यात काँग्रेसच्या नेत्यांनी इंद्रजित व मदन मोहिते यांच्यामध्ये समेट घडवत रयत पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यास भाग पाडले. मात्र मदन मोहिते यांच्या आडमुठ्या धोरणामुळे सभासदांनी दोघांसह संपूर्ण पॅनेललाच सपशेल नाकारल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी वेगळ्या संस्था निर्माण करू, कारखाना उभा करू, अशा वल्गना करून पराभवावर पांघरुण घालण्याचे काम सुरू केले आहे.या निवडणुकीत सहकार व रयत पॅनेलला संस्थापक पॅनेलने कडवी झुंज दिली. सभासदांचा कौल संस्थापक पॅनेलच्या बाजूने असल्याचे वातावरण होते, परंतु डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलच्या साम-दाम-दंड-भेद नीतीपुढे अविनाश मोहिते यांचेही चालले नाही. त्यांचे उमेदवार अल्पमतांच्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे संस्थापक पॅनेलमध्ये अजूनही धुगधुगी आहे. याच ताकदीवर त्यांनी मंगळवारी कऱ्हाड येथे सभासदांचा आभार मेळावाही घेतला.निवडणुकीत विरोधकांनी खोटे-नाटे आरोप करून आमच्याविरोधात वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला, पण सभासदांनी संस्थापक पॅनेलला दिलेला कौल चांगलाच आहे. आमचे उमेदवार अत्यल्प मताने पडले आहेत. कारखान्यात चुकीचे काही घडत असल्यास त्याला आम्ही ठामपणे विरोध करू. आम्ही फेरमतमोजणीची मागणी केली आहे.- अविनाश मोहिते, माजी अध्यक्ष कृष्णा कारखाना.