शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

‘इंदिरा आवास’ घोटाळ्याची चौकशी होणार

By admin | Updated: January 13, 2016 23:23 IST

नियामक मंडळाच्या बैठकीत निर्णय : सात आमदार, खासदारांची दांडी

सांगली : तांदूळवाडी (ता. वाळवा) गावासह जिल्ह्यातील सर्वच इंदिरा आवास घरकुल योजनेच्या निधी वाटपाची सखोल चौकशी करण्याची मागणी बुधवारी नियामक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या बैठकीस सात आमदार आणि खासदारांनी दांडी दिल्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद अध्यक्षा होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विकास यंत्रणेकडील नियामक मंडळाची बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात झाली. या बैठकीस आमदार विलासराव जगताप, नियामक मंडळाचे अशासकीय सदस्य प्रकाश पाटील, रोहिदास सातपुते, अनुराधा शिंदे, आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सुमन देशमुख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, प्रकल्प संचालक अजयकुमार माने आदी उपस्थित होते. नियामक मंडळाच्या बैठकीस सर्व आमदार, दोन खासदारांना निमंत्रित केले होते. पण, या बैठकीस केवळ आ. जगताप उपस्थित होते. उर्वरित सात आमदार आणि दोन खासदारांनी दांडी दिली. नियामक मंडळाचे अशासकीय सदस्य व वाळवा पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पाटील यांनी तांदुळवाडी येथील इंदिरा आवास घरकुल योजनेतील लाभार्थींच्या निधीच्या घोटाळ्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आ. जगताप यांनीही, घरकुल योजनेतील निधीवर जर कोण डल्ला मारत असेल, तर त्याची सखोल चौकशी करून ग्रामसेवक आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, असे सांगितले. होर्तीकर व दिलीप पाटील यांनी तांदुळवाडी घरकुल घोटाळ्याची चौकशी करून दोषी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. इंदिरा आवास घरकुल योजनेचा आढावा घेऊन निधीतील घोटाळा झाला आहे का, याचाही शोध घेतला जाईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि मुद्रा योजनेतील कर्ज देण्याकडे बँका दुर्लक्ष करीत आहेत, असा सदस्यांनी आरोप केला. यावेळी सर्व बँकांची बैठक घेऊन कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन माने यांनी दिले. (प्रतिनिधी) पीक विम्याचा लाभ द्या खरीप हंगामामध्ये पाऊस कमी झाल्याने खरीप पिकांचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ झाला आहे का, याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल घ्यावा. एकही शेतकरी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जगताप यांनी दिली.