शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप: सांगली जिल्ह्यातील २५ हजार शिक्षक, कर्मचारी संपावर

By अशोक डोंबाळे | Updated: December 14, 2023 18:20 IST

शासकीय कार्यालयांतील कामे ठप्प

सांगली : जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन-चारच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. याला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शासकीय कामे ठप्प झाली. अधिकाऱ्यांनी रजा टाकून आंदोलनास पाठींबा दिला आहे. जिल्ह्यातील २५ हजारांवर शिक्षक, कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा संघटनांनी दावा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन सुरू केले असून, शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.याबाबत माहिती अशी की, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीही शासनाकडून डोळेझाक होत आहे. यासाठी गुरुवारपासून राज्यभरात बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांही करण्यात आलेल्या आहेत.जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. तसेच शिक्षकांचाही या संपात समावेश आहे. सुमारे २५ हजारांहून अधिक शिक्षक, कर्मचारी सहभागी आहेत. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. कामासाठी आलेल्या नागरिकांना माघारी जावे लागले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाटजिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अधिकाऱ्यांनीही सामूहिक रजा टाकली आहे. तर काही संघटनांनी संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काही कार्यालयात एखादा-दुसरा कर्मचारी काम करताना दिसून आला. तरीही दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. बहुतांशी कार्यालयांना टाळा लावला होता. तसेच संपाची माहिती असल्याने नागरिकही कमी प्रमाणात दिसून आले.

टॅग्स :SangliसांगलीPensionनिवृत्ती वेतनGovernmentसरकारStrikeसंप