शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लाक्षणिक उपोषणाला वाढता पाठिंबा

By admin | Updated: May 19, 2017 23:38 IST

लाक्षणिक उपोषणाला वाढता पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दारू दुकाने वाचविण्यासाठी महापालिकेत रस्ते हस्तांतरणाचा घाट घातला गेल्याचा आरोप करीत स्वाभिमानी विकास आघाडीने गुरुवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांसह नागरिकांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. शनिवारी महासभेवेळी बांगड्या व पायताणासह निदर्शने केली जाणार आहेत. या आंदोलनाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. स्वाभिमानी आघाडीचे नेते नगरसेवक गौतम पवार, सचिव सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ते हस्तांतरणाविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. महापालिकेतील काही मंडळींनी दारू दुकानदारांकडून सुपारी घेऊन रस्ते हस्तांतरणाचा घाट घातला आहे. त्याला स्वाभिमानीचा विरोध आहे. महापौरांच्या कार्यालयातच बैठका सुरू असून, महासभेत ठराव होणार नाही याची खात्री जोपर्यंत पटत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशाराही देण्यात आला. खासदारांच्या बगलबच्च्यांकडून रस्ते ताब्यात घ्यावेत, यासाठी आर्थिक तडजोडी सुरू असल्याचा आरोपही पवार यांनी केला होता. शुक्रवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन स्वाभिमानीच्या मागणीला पाठिंबा दिला. उपमहापौर विजय घाडगे व नगरसेवक शेखर माने यांनीही आंदोलकांची भेट घेतली. उपमहापौर घाडगे यांनी स्वाभिमानीने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. महासभेत रस्ते हस्तांतरणाचा ठराव आल्यास आपण व्यासपीठावरून उतरून त्याला विरोध करू, अशी ग्वाही दिली. पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर आमचा विश्वास नसून, ते रस्ते हस्तांतरणाचा ठराव करणार नाहीतच, याची खात्री नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास नकार देण्यात आला. त्याशिवाय जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष रवींद्र काळोखे, मुनीर मुल्ला, उदय म्हारगुडे, विशाल पवार, अनिकेत खिलारे, सतीश पाटील, अशोक सत्याळ, अनिल शेटे, गजानन खरात, आशिष सावंत, प्रकाश नवलाई, कल्पना कोळेकर, नीलेश हिंगमिरे, सदाशिव रास्ते यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, शनिवारी महासभेदिवशी स्वाभिमानी विकास आघाच्यावतीने बांगड्या व पायताण घेऊन निदर्शने करण्यात येणार आहेत. ठरावाचे समर्थन करणाऱ्यांना बांगड्या व पायताण भेट देणार असल्याचा पुनरूच्चार पवार यांनी केला.