शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: November 27, 2014 00:19 IST

नव्याने ३० रुग्ण दाखल : महापालिकेकडून रॅपीड सर्व्हे

सांगली : गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेत आज, बुधवारी सांगली-मिरजेत नव्याने ३० रुग्ण आढळून आले. आतापर्यंत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात गॅस्ट्रोचे ८० रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. आज दिवसभरात पालिकेने दोन हजार घरांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. गॅस्ट्रो साथीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गॅस्ट्रो रुग्णांची सर्वाधिक संख्या मिरज शहरात आहे. आज, बुधवारी पालिकेच्या आरोग्य पथकाने केलेल्या सर्वेक्षणात मिरजेत नव्याने २० रुग्ण आढळून आले. त्यातील अकरा रुग्ण शासकीय रुग्णालयात, चार भारती हॉस्पिटल व इतर खासगी रुग्णालयात दाखल आहेत. ब्राह्मणपुरी, पिरजादे गल्ली, विसापूर वेस या परिसरात रुग्णांची संख्या अधिक आहे. मिरजेतील रेवणी गल्लीत जुलाबाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सांगली शहरातील संजयनगर, अभयनगर, शंभरफुटी रस्ता, खणभाग, जमदाडे गल्ली, यशवंतनगर, माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर या परिसरात राहणाऱ्या काहीजणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात २८ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून या रुग्णांना ताप, उलटी व जुलाबाचा त्रास सुरु होता. खासगी रुग्णालयात त्यांनी औषधोपचार घेतले, मात्र त्यांची प्रकृती खालावतच गेली. त्यामुळे ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. महापालिकेने घरोघरी सर्व्हेसाठी पथके नियुक्त केली आहेत. दररोज दोन हजार घरांचा सर्व्हे होत आहे. आतापर्यंत २० हजारहून अधिक घरांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. (प्रतिनिधी).महापौर, उपमहापौरांना आली जागमहापालिका क्षेत्रामध्ये गॅस्ट्रो व कॉलऱ्याने गंभीर स्वरूप धारण केले असून, या साथींवर उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. गॅस्ट्रो रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा स्थितीत महापौर कांचन कांबळे व उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांनी गॅस्ट्रोच्या साथीकडे दुर्लक्ष केल्याची टीका होऊ लागली होती. महापौर, उपमहापौरांनी गेल्या सात दिवसात गॅस्ट्रो साथीबाबत ना बैठक घेतली, ना उपाययोजनांचा आढावा घेतला. सर्वच स्तरातून टीकेची झोड उठू लागल्यावर महापौर, उपमहापौरांना आज जाग आली. या दोघांनीही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात येऊन रुग्णांची भेट घेतली व विचारपूस केली. काही रुग्णांच्या घरीही भेट दिली. मदनभाऊंकडून खरडपट्टीमहापालिका क्षेत्रातील गॅस्ट्रो, कॉलरा साथीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी काँग्रेसचे नेते मदन पाटील यांनी महापौर व उपमहापौरांना बोलावून त्यांची खरडपट्टी काढली. विरोधक रुग्णांना भेटी देत असताना तुम्ही काय करीत आहात, असा सवालही केला. आतापर्यंत गॅस्ट्रोबाबत आढावा घेऊन काय उपाययोजना केल्या, असा सवालही केला.