यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महानगरपालिकेने मिरज शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कोरोना बाधितांवर उपचारासाठी १३२ ऑक्सिजनेटेड बेड्सची व्यवस्था केली आहे. त्यामुळे फार मोठी मदत सांगली जिल्ह्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना हाेणार आहे. या ठिकाणी २०० बेड्सपर्यंतची वाढ होऊ शकते. अशी व्यवस्था महानगरपालिकेने निर्माण केली आहे. पुढच्या १५ ते २० दिवसांत जर रुग्णांची संख्या वाढली, तर त्या रुग्णसंख्येला कुठे ठेवायचे, हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनेटेड बेड्स वाढविण्याचे काम सुरू असून, यामध्ये आणखी वाढ करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. पॉझिटिव्ह आहे परंतु घरी राहायला जागा नाही अशा रुग्णांसाठीही येथे महापालिकेने सोय केली आहे. या ठिकाणी महानगरपालिकेने सर्व खानपानाची चांगली सोय उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
फाेटाे : २४ मिरज २