ओळ : भिलवडी (ता. पलूस) येथे हॉटेल ग्रीन पार्क लॉजिंगचे उद्घाटन उद्याेगपती गिरीश चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश पाटील, महावीर चौगुले, मोहन पाटील, सतीश पाटील उपस्थित हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे हॉटेल ग्रीन पार्क लाॅजिंगचे उद्घाटन उद्योगपती गिरीश चितळे व मकरंद चितळे यांच्या हस्ते करण्यात आले.
गिरीश चितळे म्हणाले की, गुणवत्तेशी तडजोड न करता सातत्याने व प्रामाणिकपणे केलेला उद्योग व्यवसाय नावारूपास येतो. रमेश पाटील यांच्या हॉटेल ग्रीन पार्कने अन्नपदार्थांची चव, सेवा व व्यवस्थापन क्षेत्रात गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.
रमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. हॉटेल ग्रीन पार्कचा आजवरचा प्रवास त्यांनी मांडला. भविष्यात ग्रामीण भागात या व्यवसायात नावीन्यता आणण्याचे प्रयत्न सातत्याने करणार असल्याचे सांगितले.
यावेळी गोपुज साखर कारखान्याच्या अध्यक्षा अपर्णा संग्रामसिंह देशमुख, पलूस तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मोहन पाटील, क्रांती कारखान्याचे संचालक महावीर चौगुले, दक्षिण भाग सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब मोहिते, सतीश पाटील, दीपक पाटील, दत्ता उतळे, क्रांती पाटील, ऋतिक पाटील, आदी उपस्थित होते. शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी आभार मानले.