मिरज : राष्ट्रीय शांती दल व रहिमान फाउंडेशनतर्फे मिरजेत गुरुवारपेठेत जनता क्लिनिकचे उद्घाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व हृदय रोगतज्ज्ञ डॉ. नईम शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
महापौर सूर्यवंशी म्हणाले की, मिरजेत सात ठिकाणी गरीब रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचारासाठी जनता क्लिनिकचा डॉ. शेख कुटुंबीयांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. महापालिका या उपक्रमास सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान, नगरसेवक फिरोज पठाण, अतहर नायकवाडी, राहुल पवार, आझम काझी, रियाज जमादार, मुनीर तहसिलदार, प्रमोद ईनामदार, डॉ. प्रशांत लोखंडे, जनता क्लिनिकचे संचालक डाॅ. मन्नान शेख, ॲड. एम. ए. शेख, अलाउदीन काझी, आनंदा देवमाने, मौलाना समीउल्ला, नौशाद मुल्ला, मुफ्ती मारुफ, हनिफ तहसीलदार, दस्तगीर कुपवाडे, नारायण सूर्यवंशी, हिफजूरहेमान जमादार, सलमान हेर्लेकर उपस्थित होते. शकील पटेल यांनी स्वागत केले. अब्दुल शेख यांनी आभार मानले.