शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

निवडणुकीच्या धामधुमीत सांगली जिल्ह्यात आर्थिक उलाढाल वाढली, विक्रमी जीएसटी संकलन 

By अविनाश कोळी | Updated: May 6, 2024 13:42 IST

देशातही जीएसटीने विक्रमी संकलन करताना पहिल्यांदाच दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

सांगली : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सुरु झालेल्या नव्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल वाढली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात विक्रमी १७७ कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला आहे. मागील वर्षातील एप्रिलच्या तुलनेत यंदा ३५ टक्के करसंकलन अधिक आहे.मागील आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातून एकूण १ हजार २४३ कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झाला होता. आता सांगली जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात विक्रमी जीएसटी जमा झाला आहे. एप्रिल २०२४ मध्ये १७७ कोटींचे संकलन हे जीएसटी अंमलबजावणीनंतरचे एका महिन्यातील सर्वाधिक संकलन ठरले आहे.एप्रिल २०२३ मध्ये एकूण १३१ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. यंदा त्यात ४६ कोटींची म्हणजेच ३५ टक्के वाढ नोंदली गेली आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सांगली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. एप्रिलअखेरपर्यंत निवडणुकांची धामधुम सुरुच होती. या काळात आर्थिक उलाढाल वाढल्यामुळे १७७ कोटींची विक्रमी मजल जीएसटी विभागाला मारता आली.देशातही जीएसटीने विक्रमी संकलन करताना पहिल्यांदाच दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. देशाचा विचार करताना एप्रिल २०२४मध्ये जीएसटीचा एकूण महसूल १ लाख १० हजार २६७ कोटी आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये १ कोटी ८७ लाख ३५ कोटीचा महसूल जमा होता. यंदा १२ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्राचा विचार करताना यंदाच्या एप्रिलमध्ये ३७ हजार ६७१ कोटी जीएसटी जमा झाला. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये ३३ हजार १९६ कोटी जमा झाले होते. यंदा १३ टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीGSTजीएसटी