शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’च्या गोंधळात पशुवैद्यकीय पदवी प्रवेशाची घाई, विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

By अविनाश कोळी | Updated: June 26, 2024 13:40 IST

विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम 

अविनाश कोळीसांगली : नीट परीक्षेच्या निकालाचा गोंधळ सुरू असतानाच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने मंगळवारी पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीचे वेळापत्रक जाहीर केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था असून, नाराजीही व्यक्त केली जात आहे.देशातील १ हजार ३६५ विद्यार्थ्यांची नीट परीक्षा पुन्हा झाली आहे. त्यामुळे रँकमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश नीटच्या मार्कावरच होतात. सर्वोच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणी सुरू आहे. परीक्षा पुन्हा होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. पेपरफुटीच्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. अशा गोंधळातच पशुवैद्यकीय पदवी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना २५ जून ते ७ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत दिली आहे. १९ जुलै रोजी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट जाहीर होईल. विभागीय कोट्यासाठी ३१ जुलै रोजी अर्ज भरता येईल. १ ऑगस्ट रोजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर होईल. त्याचप्रमाणे विभागीय कोट्याच्या दुसऱ्या फेरीसाठी १७ ऑगस्ट रोजी प्रेफरन्स फॉर्म भरता येणार आहे. १९ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर होईल.राज्य पातळीवरील कोट्यासाठी २३ ऑगस्ट रोजी पहिल्या फेरीसाठी प्रेफरन्स फॉर्म भरता येणार असून, २६ ऑगस्ट रोजी पहिली यादी जाहीर होईल. राज्य पातळीवरील दुसऱ्या फेरीसाठीचा प्रेफरन्स फॉर्म ५ सप्टेंबरला भरता येईल, तर ६ सप्टेंबर रोजी दुसरी निवड यादी जाहीर होईल. विभागीय आणि राज्य पातळीवरील कोट्यासाठीच्या तिसरी फेरीसाठी १३ सप्टेंबर रोजी प्रेफरन्स फॉर्म भरण्याची मुदत असून, १५ सप्टेंबर रोजी त्याची निवड यादी घोषित होईल.

पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया २४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. राज्यात पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नागपूर, मुंबई, शिरवळ, परभणी आणि उदगीर अशी पाच सरकारी महाविद्यालये असून, या महाविद्यालयातून ३८४ जागा उपलब्ध आहेत. यापैकी १५ टक्के जागा या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात. महाराष्ट्रात एकही खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नाही. गेल्या कित्येक वर्षांत एकही नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय राज्यात सुरू झालेले नाही. यामुळे पशुवैद्यकीय महाविद्यालयातून खूपच कमी जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

देशभरात नीट परीक्षेच्या निकालासंदर्भात गोंधळाचे वातावरण असून, नीट परीक्षा पुन्हा होणार की नाही, याबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये साशंकता आहे. सर्वोच्च न्यायालयात ८ जुलै रोजी याची सुनावणी होणार असून, त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल. असे असताना घाईघाईत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे कारण नव्हते. ८ जुलैपर्यंत वाट पाहता आली असती. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सल्लागार, सांगली

टॅग्स :Sangliसांगली