शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली लोकसभेत पुन्हा तिंरगी लढत! महाआघाडी, युतीत वाढले दावेदार; संजय पाटील, विशाल पाटील व चंद्रहार पाटील शर्यतीत

By हणमंत पाटील | Updated: August 25, 2023 17:54 IST

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र बदलत आहे.

सांगली : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र बदलत आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे आगामी निवडणूकही तिरंगी करण्याची खेळी भाजपकडून पुन्हा खेळली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत फूट पडल्याने महाविकास आघाडी व युतीत लोकसभा उमेदवारीवरील दावेदार वाढले आहेत. तरीही सद्य:स्थितीत खासदार संजय पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील व पैलवान चंद्रहार पाटील या तिघांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. सांगली लोकसभेची पुनर्रचना २००९ मध्ये झाली. तोपर्यंत सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१४ नंतर केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

भाजपच्या उमेदवारीवरून दोन गट ...काँग्रेस आघाडीचे संजय पाटील यांना भाजपने ऐनवेळी उमेदवारी देऊन २०१४ च्या मोदी यांच्या लाटेत त्यांना निवडून आणले. त्यानंतर २०१९ ची लोकसभा वंचित बहुजन विकास आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी लढविली. त्यामुळे भाजपला हा विजय सोपा झाला. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार पाटील यांना उमेदवारी देण्यावरून जिल्ह्यातील भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी देण्यासाठी नाराज गट सक्रिय झाला आहे. शिवाय युतीमध्ये सामील झालेला शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गटही उमेदवारीवर दावा करणार आहे.

काँग्रेसच्या जागेवर शिवसेना, राष्ट्रवादीचा दावा...महाविकास आघाडीत सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे सध्यातरी विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर काँग्रेसमध्ये दुमत नाही. त्यामुळे पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू केल्याचे दिसून येते. परंतु, २०१४ व २०१९ या सलग दोन लोकसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दावा केला जातोय.

वंचितची जागा बीआरएस घेणार का?आघाडी व युतीमध्ये राजकीय पक्षांची व इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या दोन्हीमधील नाराज गटातील उमेदवाराच्या गळ्यात लोकसभेची माळ घालण्याच्या तयारीत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आहे. त्यासाठी बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनीही सांगलीतील मेळाव्याला उपस्थित राहून चाचपणी केली. सांगली हा शेतकरी संघटनांचा पट्टा असल्याने येथे शेतकरी कार्ड वापरण्याची खेळी बीआरएस करणार आहे. त्यामुळे गत पंचवार्षिक निवडणुकीत वंचितने घेतलेल्या मतांची जागा बीआरएस घेणार का ? याविषयी उत्सुकता आहे. 

टॅग्स :SangliसांगलीSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकlok sabhaलोकसभा