शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात बेकायदा थेरपी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:58 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शहरातील जुन्या भाजी मंडई परिसरात हेल्थ एनर्जीच्या नावाखाली मोफत थेरपी केंद्र चालविले जात आहे. त्यामुळे या केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी होते. परंतु हा सर्व प्रकार बेकायदेशीर असून, अशा उपचाराची रुग्णांना सवय लावून त्यांच्या गळ्यात लाखो रुपये किमतीची यंत्रे मारली जात आहेत. याकडे ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शहरातील जुन्या भाजी मंडई परिसरात हेल्थ एनर्जीच्या नावाखाली मोफत थेरपी केंद्र चालविले जात आहे. त्यामुळे या केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी होते. परंतु हा सर्व प्रकार बेकायदेशीर असून, अशा उपचाराची रुग्णांना सवय लावून त्यांच्या गळ्यात लाखो रुपये किमतीची यंत्रे मारली जात आहेत. याकडे उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे.काही वर्षांपूर्वी इस्लामपूर बसस्थानक रस्त्यावर अशाच प्रकारचे केंद्र ‘सेराजेम’ या नावाने सुरू केले होते. गुडघे, मणके, सांधेदुखीचा त्रास असणाºया रुग्णांना तेथे मोफत उपचार दिले जात होते. या उपचाराची सवय लागल्यानंतर ४0 ते ५0 हजार रुपये किमतीचे यंत्रच रुग्णाला खरेदी करण्यासाठी आग्रह केला जात होता. यावर ‘लोकमत’ने आवाज उठवून ते केंद्र बंद पाडले होते.आता पुन्हा इस्लामपुरात थेरपी करणारे केंद्र हेल्थ एनर्जीच्या नावाखाली सुरू झाले आहे. येथे सांधे, गुडघेदुखी, मणक्याचे आजार तसेच इतर अनेक आजारांवर मोफत थेरपी केली जात आहे. मोफत उपचार होत असल्याने येथे शहरासह परिसरातील गावांतून आलेले अनेक रुग्ण पहाटेपासूनच उपचारासाठी रांगा लावून बसतात. येथेही रुग्णांना उपचाराची सवय लावून पन्नास हजारपासून दीड लाख किमतीच्या यंत्राची विक्री केली जात आहे.या केंद्राला आरोग्य विभागाची परवानगी नाही. या थेरपीवेळी एखाद्या रुग्णाला त्रास होऊ लागला, तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नाही. येथे फक्त विपणन प्रतिनिधीच उपस्थित असतात. तेच या यंत्राचा कसा वापर करायचा, याची माहिती देतात आणि थेरपी यंत्राची विक्री करत आहेत.केवळ प्रात्यक्षिक, तर तेच ते रुग्ण का?हेल्थ एनर्जी या केंद्राचे व्यवस्थापक प्रशांत कारंजकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, रुग्णांना ही थेरपी कशी वापरावयाची याचे प्रात्यक्षिक दाखवतो. या सेंटरद्वारे मॅट आणि बेडची विक्री केली जाते. त्याची किंमत ५0 हजार ते दीड लाखांपर्यंत आहे. जर येथे केवळ प्रात्यक्षिक दाखवले जाते, तर मग दररोज तेच तेच रुग्ण का येतात, हा प्रश्न आहे. यातूनच यंत्र वापरण्याची सवय लावून ती रुग्णाच्या गळ्यात मारायची, असाच धंदा सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.