शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वाळू उपसा; पाचजणांवर गुन्हा महसूल विभागाची कारवाई : एक कोटींचा माल जप्त

By admin | Updated: May 14, 2014 00:01 IST

इस्लामपूर : कोळे व खरातवाडी (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीपात्रात परवान्यापेक्षा जादा यांत्रिक बोटींचा वापर करून वाळू उपसा करणार्‍या दोघा

 इस्लामपूर : कोळे व खरातवाडी (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीपात्रात परवान्यापेक्षा जादा यांत्रिक बोटींचा वापर करून वाळू उपसा करणार्‍या दोघा ठेकेदारांसह बहे येथील नदीपात्रातून वाळूची खुलेआम चोरी करणार्‍या एकाविरुद्ध तहसीलदारांच्या आदेशाने पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत वाळू उपशासाठी मळीची जमीन देणार्‍या दोन शेतकर्‍यांचाही गुन्ह्यात समावेश आहे. काल रात्री छापा टाकून महसूलच्या पथकांनी कारवाई केली. या कारवाईत ३६७ ब्रास वाळू, २२ यांत्रिक बोटी, ५ पोकलँड मशीन असा जवळपास एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला. महेश विलासराव पाटील (नरसिंहपूर, ता. वाळवा), प्रमोद तानाजीराव कदम (रा. पेर्ले, ता. कºहाड), शशिकांत दत्तात्रय पाटील (रा. जुनेखेड, ता. वाळवा) या वाळू उपसा करणार्‍यांसह त्यांना जमीन उपलब्ध करून देणार्‍या जालिंदर महादेव पवार, निवृत्ती श्रीपती जाधव (दोघे, रा. हुबालवाडी, ता. वाळवा) या शेतकर्‍यांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी पंडित बाबूराव चव्हाण आणि विनोद मनोहर कांबळे यांनी रात्री उशिरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. वाळू माफियांविरोधातील या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे. प्रशासनाने हस्तगत केलेला मुद्देमाल त्या-त्या गावच्या पोलीसपाटलांच्या ताब्यात दिला आहे. बेकायदा वाळू उपशा विरुद्ध आलेल्या तक्रारी विचारात घेऊन तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी काल रात्री ही कारवाई केली. कोळे हद्दीत अधिकृत लिलावधारक महेश पाटील हा परवान्यापेक्षा दहा यांत्रिक बोटींचा जास्तीचा वापर करून वाळू उपसा करताना आढळून आला. १ लाख ४२ हजार किमतीची १३५ ब्रास वाळू, दहा यांत्रिक बोटी आणि दोन पोकलँड असा माल पथकाच्या हाती लागला. त्यानंतर बहे येथील नदी पात्रात शशिकांत दत्तात्रय पाटील (जुनेखेड) हा परवाना न घेता खुलेआम वाळू उपसा करीत असल्याची माहिती मिळाल्यावर मंडल अधिकारी बबन करे, तलाठी पंडित चव्हाण, विनोद कांबळे यांच्या पथकाने छापा टाकला. तेथे एक लाख रुपये किमतीची २५ ब्रास वाळू आणि एक पोकलँड हस्तगत करण्यात आले. वाळू चोरीसाठी मळीची जमीन देणार्‍या जालिंदर पवार, निवृत्ती जाधव या शेतकर्‍यांवरही गुन्हा नोंदविण्यात आला. खरातवाडी हद्दीत पेर्ले येथील प्रमोद कदम यांच्या वाळू उपसा केंद्रावर छापा मारून पथकाने १२ यांत्रिक बोटी, दोन पोकलँड मशीन आणि २0७ ब्रास वाळू असा ५४ लाख ७५ हजारांचा माल जप्त केला. (वार्ताहर)