शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत आरक्षणे बेकायदा उठवून भूखंडांचा बाजार करणारी टोळी, नागरिक जागृती मंचाने केली कारवाई मागणी

By संतोष भिसे | Updated: August 11, 2023 16:12 IST

महापालिकेतील भूखंड कारनाम्यांवर जोरदार चर्चा

सांगली : महापालिका क्षेत्रातील अनेक भूखंडांवरील आरक्षणे बेकायदा उठवून त्यांचा मलिदा खाण्याचे प्रकार जोमात सुरु आहेत. आरक्षणे उठविण्यासाठी दलालांची टोळीच कार्यरत झाली आहे. यामध्ये सामील असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिक जागृती मंचाने केली. सांगलीत शुक्रवारी सजग नागरिकांची व्यापक बैठक झाली. त्यामध्ये महापालिकेतील भूखंड कारनाम्यांवर जोरदार चर्चा झाली.बैठकीला माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, हणमंत पवार, पद्माकर जगदाळे, शंभुराज काटकर, विकास मगदुम, डॉ. संजय पाटील, रवींद्र चव्हाण, तानाजी रुईकर आदी उपस्थित होते. महापालिकेचा कार्यकाळ संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर महासभेत अनेक बेकायदा ठराव घुसण्याचे प्रकार सुरु आहेत. जाताजाता भूखंडांचा मलिदा ढापण्याकडे अनेकांच्या नजरा आहेत. यावर बैठकीत चर्चा झाली.हणमंत पवार म्हणाले, अनेक आरक्षित जागा धोक्यात आल्या आहेत. कायद्यातील पळवाटा शोधून आरक्षणे उठवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पद्माकर जगदाळे म्हणाले, महापालिकेच्या विकास आराखड्याची मुदत संपत आली आहे. त्यामुळे नवा आराखडा तत्काळ तयार करणे आवश्यक आहे. आराखड्यानुसार प्रशस्त रस्ते ही शहराची प्रमुख गरज आहे. त्यामुळे रस्त्यांची आरक्षणे उठवण्यात येऊ नयेत.नितीन शिंदे म्हणाले, आरक्षण विकसित करण्याच्या कायद्यानुसार आतापर्यंत किती आरक्षणे विकसित करण्यात आली? याचा तपशील महापालिकेने जाहीर करावा. ती नियमानुसार आहेत की नाही? याचीही चौकशी झाली पाहिजे. वर्षानुवर्षे आरक्षित असलेल्या जमिनी व त्यांच्या मालकांना योग्य  मोबदला मिळाला पाहिजे.बैठकीला डॉ. संजय पाटील, राहुल पाटील, किरण कांबळे, अनिल कोळेकर, आशिष कोरी, तोहिद शेख, निलेश पवार, सुरेश साखळकर, अनिल कवठेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली